Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमापोटी त्याग केला! मुलाच्या मुंडन समारंभात महिलांसह संपूर्ण कुटुंबाने केलं टक्कल; Video Viral

Family Mundan Video : मुलाला एकटं वाटू नये म्हणून घरातील महिलांसह संपूर्ण कुटुंबाने मुंडन करुन घेतलं. कुटुंबाच्या या कृतीने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतलं असून यूजर्सने यावर आपल्या टिका व्यक्त केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 20, 2026 | 10:19 AM
प्रेमापोटी त्याग केला! मुलाच्या मुंडन समारंभात महिलांसह संपूर्ण कुटुंबाने केलं टक्कल; Video Viral

प्रेमापोटी त्याग केला! मुलाच्या मुंडन समारंभात महिलांसह संपूर्ण कुटुंबाने केलं टक्कल; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गुजरातमध्ये एका बाळाच्या मुंडन सोहळ्यात संपूर्ण कुटुंबाने केस काढून त्यागाचा अनोखा दाखला दिला.
  • बाळाला एकटे वाटू नये म्हणून महिलांसह सर्वांनी आनंदाने टक्कल केले.
  • व्हिडिओ व्हायरल होत असून काहींनी कौतुक तर काहींनी या कृतीवर टीका केली आहे.
आपलं कुणावर प्रेम असेल तर या प्रेमासाठी कधी ना कधी त्याग हा करावा लागतोच. प्रेमात त्यागाचे महत्त्व काही वेगळेचं. अलिकडे सोशल मिडियावर अशाच एका त्यागाचे उदाहरण शेअर करण्यात आले आहे जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हिंदू धर्मात सहसा १ ते ३ वर्षांच्या दरम्यान नवजात बाळाचे मुंडण केले जाते म्हणजेच त्याचे सर्व केस कापून टाकले जातात. या विधीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. अशातच आता अलिकडे सोशल मिडियावर एका चिमुकल्याच्या मुंडन सोहळ्याचे दृष्य शेअर करण्यात आले आहे ज्यात बाळासोबतच संपूर्ण कुटुंबाने आपल्या केसांचा त्याग केल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे, फक्त पुरुष मंडळीच नाही तर घरातील महिला देखील आपली केस काढून टक्कल करताना दिसून आल्या. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची सुरुवात मुलाच्या स्वागताने होती. त्याच्या आईने त्याला हातात उचलून घेतलेले असते ज्यात मुलाचे मुंडन झालेले असते. यानंतर पुढे मुलाच्या आईचे मुंडन होताना आपल्या नजरेस पडते. मग आणखी एक महिला सदस्य आपल्या केसांचा त्याग करते. मुख्य म्हणजे असं करताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच दुःखद भावना नव्हती, उलट आनंदाने चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून त्या आपल्या केसांचा त्याग करण्यास तयार होत्या. व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण कुटुंब मुंडन करुन एकत्र उभे असल्याचे दाखवण्यात येते. यात एकाच्या डोक्यावर केस नसते पण मनात समाधानाची भावना असते. मुलाच्या आनंदासाठी संपूर्ण कुटुंबाने उचलले हे पाऊल आता यूजर्सना चांगलेच थक्क करत आहे. त्याचबरोबर सोशल मिडियावरही व्हिडिओ सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. काहींनी कुटुंबाच्या या कृतीचे समर्थन केले आहे तर काहींनी ही चुकीची शिकवण असल्याचे म्हटले आहे.

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘गुजरातच्या एका चिमुकल्या गावात, आपल्या लहान मुलाला त्याच्या मुंडन समारंभाच्या वेळी एकटे वाटू नये, याची खात्री करण्यासाठी संपूर्ण कुटुंबानेच आपले डोके मुंडून घेतले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येक क्षणी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, खरे कुटुंब असेच असते.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आणि लग्नानंतर त्याला एकटेपणा वाटला तर?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरं सांगायचं तर, हे चांगलं पालकत्व नाही. मुलाला हा खरा धडा शिकवण्याची ही एक उत्तम संधी होती की, कधीकधी गोष्टींना एकट्याने सामोरे जावे लागते आणि त्यात काही गैर नाही. पण त्याऐवजी, त्यांनी त्याला अगदी उलट शिकवले, की जग तुमच्यासाठी स्वतःला जुळवून घेईल.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Mundan ceremony video full family shaves head for child viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • Gujrat
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
1

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
4

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.