Viral Video: पाकिस्तानी महिला भरपावसात करत होती रिपोर्टिंग, म्हणाली... ऐकूनच पोट धरून हसाल
भारताच्या शेजारील देश पाकिस्तान नेहमीच चर्चेत असतो. या देशाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज आपल्या हसवतात तर काही थक्क करून जातात. सध्या पाकिस्तानी रिपोर्टरचा एक हास्यास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेक लोकांचे लक्ष वेधले असून रिपोर्टिंग करताना ती असा काही बोलते की ऐकून सर्वांचेच हसू फुटते. हास्याने लोटपोट करणारा हा व्हिडिओ एकदा पहाच.
पाकिस्तानचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात जे पाहून हसू अनावर होईल. यातील बहुतांश व्हिडीओ पाकिस्तानींवर विनोद म्हणून दाखवले जातात.नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला पत्रकार दिसत आहे, जी खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला माइक पकडून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. यावेळी भरपावसात ही महिला रिपोर्टिंग करताना दिसत आहे.
हेदेखील वाचा – काय सांगता… अविवाहित मुलांसाठी सरकराने सुरु केली ‘लाडकी गर्लफ्रेंड योजना’, हास्यापद Video Viral
सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानातही यावेळी पावसाने धुमाकूळ घेतला आहे. पाकिस्तानातील पावसाची स्थिती दाखवण्यासाठीएक महिला पत्रकार भरपावसात उभी राहून रिपोर्टिंग करताना व्हिडिओत दिसून आली. मात्र यानंतर क्षणार्धात असे काही घडते की या महिला पत्रकाराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.
रिकॉर्ड कीजिएगा ये, डिलीट न कीजिएगा ये…
गौर से देखिए कई बार रिपोर्टिंग के दौरान कैसे कैसे हादसे हो जाते हैं। #ReportersLife pic.twitter.com/QiESM0CGF1
— THE SOCIALIST (@socialist55) August 18, 2024
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येते की, पाकिस्तानातील एक पत्रकार महिला भरपावसात रस्त्यावर रिपोर्टिंग करत आहे. तिच्या बाजूने रस्त्यावरील वाहतूक सुरू आहे आणि ती रस्त्याच्या एका बाजूला उभी राहून हवामानाचे अपडेट देताना दिसत आहे. यादरम्यान तिच्या अंगावर पावसाचे पाणी पडते आणि मग ती हसून म्हणते की, ‘हे ही रेकॉर्ड करा, डिलीट करू नका.” गोंडस स्मितहास्य करत तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. तिच्यातील ही निरागस्तता पाहून अनेक लोकांना हा व्हिडिओ फार आवडला आहे तर काहींना यावर हसू नावर झाले आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @THE SOCIALISTX नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर आता अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत. एका युजरने लिहिले आहे, हा एक अप्रतिम व्हिडीओ आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ही एक अतिशय गोंडस शैली आहे.