सोशल मीडियावर एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला जगाच्या कानाकोऱ्याची माहिती सहज घरबसल्या आपल्या फोनच्या मदतीने आपल्यापर्यंत पोहचू शकते. सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ पोस्ट शेअर होत असतात. व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल ते करायला बघतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला पोट धरून हसवतात तर काही आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. आता देशातील अविवाहित पुरुषांच्या समस्येवर उपाय म्हणून सरकार ‘लाडकी गर्लफ्रेंड योजना’ आणत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्की काय प्रकरण आहे? सविस्तर जाणून घ्या.
काही दिवसांपासून राज्यभर सरकारच्या नवनवीन योजनांचा डंका संपूर्ण राज्यभर पसरत आहे. मुख्यमंत्र्यांद्वारे सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महत्त्वकांक्षी योजनेने संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घातला असून महिला मोठ्या संख्येने आता या योजनेचा लाभ घेताना दिसत आहे. यानंतर महिलांपाठोपाठ सरकारने पुरुषांसाठीही मदत म्हणून लाडका भाऊ योजना सुरु केली. याच पार्शवभूमीवर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात लाडकी गर्लफ्रेंड योजने विषयी सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – धक्कादायक! तरुणाने चाकू-नेलकटरसह चाव्यांचा गुच्छ गिळला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला भररस्त्यावर काही लोक एका गोष्टीकडे बघून हसताना दिसत आहेत. यात आपल्याला अनेक लोकांच्या हास्यापद प्रतिक्रिया दिसून येत आहेत. मात्र जेव्हा कॅमेरा त्या गोष्टीकडे रोल करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या हसण्यामागच्या सत्याचा उलगडा होताना दिसून येतो. यावेळी एक व्यक्ती एक बोर्ड घेऊन रस्त्यावर उभा असतो. या बोर्डवर लिहिलेले वाचून तुम्हालाही लगेच हसू फुटेल.
व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती भररस्त्यात एक बोर्ड घेऊन उभा असतो या बोर्डाकडे पाहून अनेक लोक अक्षरशः पोट धरून हसत असतात. या बोर्डवर लिहिलेले असते की, गर्लफ्रेंडचे लाड पूर्ण करण्यासाठी लाडकी गर्लफ्रेंड योजना सुरु करून द्या. Porter App द्वारे भारतात कुठेही करियर सेवा करून घ्या. दरम्यान हा हास्यापद व्हिडिओ @_sahil_0919 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी फनी ईमोजी शेअर करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिले आहेत तर मोठ्या प्रमाणात आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.