
धुरंधर चित्रपटातील 'शरारात' गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी थिरकवली कंबर... युजर्स म्हणाले, "यांना तर लाजाच नाहीत"; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका लग्नसमारंभातील दृश्य दिसून येते. कदाचित त्यावेळी संगीताचा समारंभ सुरु असतो ज्यात दोन तरुणी आपले नृत्य सादर करत असतात. त्याच्या आजूबाजूला नातेवाईक त्यांचा डान्य पाहण्यासाठी सज्ज असतात आणि तितक्यातच शरारत हे गाणं डिजेवर वाजवलं जात. गाण्यातील स्टेप्स हुबेहुब फाॅलो करुन तरुणी सुंदर नृत्य प्रदर्शन करतात. ढोलकीच्या तालाने, गाण्याचे सुर आणि मुलींच्या हावभावांनी असे वातावरण निर्माण केले की पाहुण्यांना टाळ्या वाजवाव्या लागल्या. या व्हिडिओवरून पुन्हा एकदा सिद्ध होते की बॉलीवूड संगीताची पोहोच सीमा ओलांडते. भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असले तरी, धुरंधरचे गाणे पाकिस्तानमध्ये लग्नाचे मुख्य आकर्षण बनले आहे.
Video of Dance on Dhurandhar Movie Song Shararat at Pakistani Wedding goes viral on social media. Reportedly Pakistan has crossed 1.8 million pirated downloads of Dhurandhar because of Ban. pic.twitter.com/rzot0ikoir — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) January 5, 2026
हा व्हिडिओ @MeghUpdates नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चला पाकिस्तानातूनही भारतात पैसे येत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या पाकिस्तानी लोकांना लाज नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चित्रपटावर बंदी घाला, संगीतावर नाही.
जेव्हा एखाद्या चित्रपटावर अधिकृतपणे बंदी घातली जाते पण त्याची गाणी लग्नसमारंभात नाचत असतात – आणि १.८ दशलक्ष पायरेटेड डाउनलोड्स – तेव्हा ते फक्त एकच गोष्ट सिद्ध करते: संस्कृती सीमांचा आदर करत नाही आणि बंदी अनेकदा नियंत्रणापेक्षा जास्त उत्सुकता निर्माण करते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.