
Jokes
अलीकडे धावपळीच्या जगात तणाव सामान्य होत चालला आहे. हा ताण कमी करण्यासाठी अनेक मनोरंजक गोष्टी करतात. पण जोक्स वाचने सर्वात आनंददायी असते. यामुळे तुमचा ताणही कमी होत आणि आयुष्यही वाढते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही मजेदार, भन्नाट जोक्स. जे वाचून तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाईल.
आजचे शहाणपण…
काम असे करा की लोक तुम्हाला…
.
.
पुन्हा काम सांगणार नाहीत…!!!
पांचट Jokes : पांचट पण झक्कास! हसण्याचा परफेक्ट डोस, जे वाचून तुम्ही राहाल टवटवीत
शिक्षक आणि रामू
शिक्षक : वाईन शॉप आणि कॉफी शॉपमध्ये फरक काय आहे?
रामू : सोप्पं आहे सर
प्रेमाची सुरुवारत कॉफी शॉपमध्ये होते आणि शेवट वाईन शॉपमध्ये
नवरा बायको
नवरा-बायको टीव्हीवर डिस्कव्हरी बघत असतात. यावेळी चॅनेलवर म्हैस दिसते.
ते पाहून नवरा बायकोला म्हणतो…
नवरा : ते बघ तुझी नातेवाईक!
बायको : अय्या… सासुबाई!
डॉक्टर आणि महिला पेशंट
महिला : डॉक्टर माझं डोकं खूप दुखतंय.
डॉक्टर : मॅडम, सिटी स्कॅन करावं लागले.
महिला : पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी,
सगळी सिटी स्कॅन करायची काय गरज…!!!
गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड
गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडला फोन लावते…
गर्लफ्रेंड : जानू तू कुठे आहेस??
बॉयफ्रेंड : मी बँकेत आहे शोना…
गर्लफ्रेंड : अरे मग येताना, 20 हजार रुपये घेऊन ये ना,
मला मोबाईल घ्यायचाय
बॉयफ्रेंड : अगं मी बल्ड-बँकेत आहे…
रक्त पिणार का रक्त…??
दोन मैत्रीणींमधील चर्चा …
मैत्रीण १ : अगं, काल दिवसभर नेटच चालत नव्हते.
मैत्रीण २ : मग काय केलं…?
मैत्रीण १ : काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारल्या,
चांगला वाटला स्वभावाने…!!!
पांचट Jokes : शहाणे लोक कमी बोलतात, कारण? जाणून तुम्हीही खळखळून हसाल