पांचट Jokes : शहाणे लोक कमी बोलतात, कारण? जाणून तुम्हीही खळखळून हसाल (फोटो सौजन्य: iStock)
विनोद म्हणजे आयुष्याता एक महत्त्वाचा घटक, ज्यामुळे आपले आयुष्य वाढते. पण सर्वांनाच लोकांना खळखळून हसायला आणि हसवायला जमत नाही. यामुळेच आम्हा आज खास तुमच्यासाठी भन्नाट असे जोक्स लिहिले आहे. तुम्हीही खळखळून हसाल आणि इतरांनाही हसावाल.
आजचे शहाणपण…
शहाणे लोक कमी बोलतात…
.
.
कारण ज्यांच्याकडे शहाणपण नाही, त्यांना गप्प राहता येत नाही
पांचट Jokes : उठलात? आज काय दिवे लावणार? त्यापेक्षा वाचा ‘हे’ भन्नाट मराठी जोक्स
शिक्षक आणि रामू
शिक्षक : सर्वांनी निबंध लिहा, ‘माझी सायकल’
रामू : माझील सायकल होती… आता ती माझ्या भावाकडे आहे…
निबंध संपला!
शिक्षक : निबंध पाहून शिक्षक कोमात, रामू जोमात.
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड
बॉयफ्रेंड : मी तुला रोज भेटतो, पण तरी तुझी आठवण येते…
गर्लफ्रेंड : अय्या हो?
बॉयफ्रेंड : हो, कारण भेटल्यावर माझं मन शांत होतं, पण पाकिटं रिकामं होतं!
नवरा-बायको
नवरा : काल तु मला झोपेत शिव्या देत होतीस
बायको : नाही ओ, तुमचा गैरसमज झाला असेल
नवरा : कसला गैरसमज?
बायको : मी झोपेत होते, म्हणून…!
चिंटू आणि डॉक्टर
डॉक्टर : तुमचं नाव काय?
चिंटू : चिंटू
डॉक्टर : काय होतयं?
चिंटू : डॉक्टर लोक मला म्हणतात मला विसराळूपण झालाय.
डॉक्टर : कधीपासून
चिंटू : काय कधीपासून?
दोन मित्रांमधील चर्चा
मित्र १ : अरे, आज माझी आई मला “बाळा” म्हणाली!
मित्र २ : अरे व्वा! पण, मग तू हे एवढं दु:खी होऊन का सांगोतय?
मित्र १ : अरे ती लगेच पुढे म्हणाली – “बाळ, वीजबिल भर!”
आलं ना हसू? तुम्हाला हे विनोद आवडले असतील, तुमच्या मित्रांना आसपासच्या लोकांना नक्की शेअर करा आणि सर्वांना खळखळून हसवा.






