'ऑगी के मसालेदार गोलगप्पे...' पाणीपुरीवाल्याची मिमिक्री पाहून तुम्हालाही आनंद होईल; येईल बालपणाची आठवण
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडिया आपल्याला हसू आवरता येत नाही. आत्तापर्यंत तुम्ही डान्स रील्स, स्टंट व्हिडिओ, भांडणाचे व्हिडिओ, जुगाड करणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. तसेच मीमीक्री करणाऱ्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील.
सध्या असाच एक मीमीक्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ एका पाणीपुरीविक्रेताचा आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये पाणीपुरा विक्रेता तुमच्या आमच्या आवडीच्या कार्टूनच्या आवाजात पाणीपुरा विकताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण नक्की येईल.
पाणी पुरा कोणाला आवडत नाही. पण जर पाणीपुरावाल्या हटक्या अंदाजात पाणीपुरी विकत असेल तर मग तर सगळेच तिथे जाता. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण पाणीपुरीचा गाडा घेऊन चालला आहे. त्याच्या हातात एक मोठा मेघाफोन असून तो त्यामधून मसालेदार गोलगप्पे लेलो असे म्हणत आहे. विशेष म्हणजे तो ऑगीच्या आवाजात असे बोलताना दिसत आहे. तो सुरूवातीला म्हणतो की मसालेदार गोलगप्पे ले ले ऑगी के मसालेदार गोलगप्पे, आणि पुढे ऑगी आणि जॅकच्या आवाजात त्यांचे संवाद म्हणतो. तो इतका परफेक्ट आवाज काढतो की असे वाटते की खरेच ऑगी पाणीपुरी विकत आहे.
हे देखील वाचा – ‘हाय रे हाय तेरा ठुमका’ गाण्यावर काकांनी खेळला जबरदस्त गरबा; पाहून नेटकरी म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर gujaratsamacharofficial या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून लाईक केले आहे. तसेच यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, काय टॅलेंट आहे ऑगी भाऊ, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, संध्याकाळी टीव्हीवर येणाऱ्या कार्टूनचा हा आवाज – डबिंग करणारा हाच तर नाही ना? असा प्रश्न त्याने विचारला आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, वा काय मीमीक्री केली भावाने. तर अनेकांनीयावर हसण्याचे इमोजी शेअर केल्या आहेत.
हे देखील वाचा- Viral Video: वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी; खेळला असा दांडिया की लोक पाहतच राहिले