
फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
माहितीनुसार, ही घटना २५ जुलै रोजी घडूल आली. जस्टिन हॉवर्ड आणि डॅनिएल मॅकिनन यांनी ह्यूस्टनमधील South Sam Houston Parkway West येथील Popeyes आउटलेटमधून फ्राईड चिकन ऑर्डर केले. तक्रारीनुसार, जस्टीनने जसा चिकनचा एक तुकटा हाताने तोडला त्यातील दृष्ये पाहून तो थबकला. चिकनच्या आत त्याला पांढऱ्या रंगाची एक विचित्र वस्तू दिसू लागली. कपलने दावा केली की, नीट पाहिल्यानंतर चिकनमध्ये काँडोम असल्याचे त्यांना स्पष्ट झाले. चिकनमध्ये काँडोम आढळल्यानंतर ते घाबरले आणि त्यांनी त्वरीत त्याला खाणे थांबवले. कपलच्या दाव्यानुसार, यानंतर ते घाबरले की खाताना काँडोमचा भाग चुकून त्यांच्या पोटात तर गेला नसावा. हे काँडोम यात कसे आले, कधीपासून ते चिकनमध्ये होते आणि ते सुरक्षित आहे की नाही याची कोणतीच माहिती त्यांच्याजवळ नव्हती.
कपलच्या दाव्यानुसार, या घटनेनंतर त्यांनी रेस्टोरेंटला याची तक्रार केली पण त्याकडे कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. उलट कथितरित्या ते या गोष्टीवर हसून थट्टा-मस्करी करु लागले. खटल्यात दावा केला आहे की, कर्मचाऱ्यांनी वारंवार चिकन बदलून देण्याचा आणि नवीन ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला. कपलने स्पष्ट केले की, खूप आग्रह केल्यानंतर त्यांना अखेर रिफंड देण्यात आला.
कंपनीविरुद्ध केली केस
कपलने ३ ऑगस्ट रोजी हॅरिस काउंटी जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणात पॉपईजची मूळ कंपनी रेस्टॉरंट ब्रँड्स इंटरनॅशनल, पॉपईज लुइझियाना किचन आणि स्थानिक फ्रँचायझी ऑपरेटर आमाना बिझनेसेस यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत. दाव्यात निष्काळजीपणा, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि टेक्सासच्या ग्राहक संरक्षण कायद्यांचे उल्लंघन असे अनेक आरोप लावण्यात आले आहेत. कपलने या प्रकरणात कंपनीकडे १५ लाख डाॅलर्सहून अधिक भरपाईची मागणी केली आहे.
Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
चाैकशीला सुरुवात
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच या घटनेमुळे स्थानिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी जुलैच्या अखेरीस रेस्टाॅरंटमध्ये दाखल होत चाैकशीची मागणी केली. त्यांनी व्यवस्थापनाला हे प्रकरण गांभीर्याणे घेण्याचे आणि चाैकशी पूर्ण होईपर्यंत आउटलेटमधील चिकन विक्रिवर बंदी घालण्याची मागणी केली. दरम्यान कपलच्या या दाव्यात किती सत्यता आहे याची चाैकशी आणि न्यायालयाचा निकाल यांची दखल घेणे जास्त महत्त्वाचे ठरेल.