
जंगलाच्या राजाची दहशत... विशाककाय घोड्याचा गळा धरला अन् ओढतंच अरण्यात नेलं; शिकारीचा थरारक Video Viral
बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती पत्नी, मागून पती आला अन् भररस्त्यात सुरु झाला राडा; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
पोस्टच्या कॅप्शननुसार, ही घटना उत्तराखंडच्या रामनगर परिसरातून समोर येत आहे. इथे फेरफटका मारताना एका सिंहाची नजर जवळील घोड्यावर जाते आणि कोणताही विचार न करता तो लगोलग त्याची शिकार करण्याचा निर्धार बनवतो. व्हिडिओत घोडा हतबल होऊन जमिनीवर पडल्याचे दिसते तर सिंह त्याचा गळा पकडत त्याला अरण्यात खेचून नेताना दिसतो. भल्यामोठ्या सिंहासमोर आपलं काहीच चालणार नाही हे माहिती असल्यामुळे घोडा बचावासाठी साधा प्रयत्नही करत नाही आणि आपली हार स्वीकारतो. कदाचित काही क्षणांत आपला मृत्यू होणार आहे याची जाणीव त्याला झालेली असते.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास घडली. राष्ट्रीय महामार्ग ३०९ आणि गर्जिया पर्यटन क्षेत्राच्या जुन्या प्रवेशद्वारादरम्यान, गर्जिया भागातील झुला पुल चौकाजवळ वाघाने एका घोड्यावर हल्ला केला आणि त्याला आपले शिकार बनवले. या घटनेमुळे वन विभागाला सतर्क करण्यात आले असून परिसरातील गस्त वाढवण्यात आली आहे. स्थानिकांना आणि पर्यटकांना जंगलाच्या जवळपास न जाण्याचा सल्ला दिला गेलाय. दिवसाढवळा सिंहाची ही शिकार अनेकांसाठी धोक्याचे कारण बनले आहे. पर्यटकांची वर्दळ या ठिकाणी नेहमीच असते ज्यामुळे सिंहाचे हे कृत्य अनेकांचा धोका वाढवते. स्थानिक आणि पर्यटकांना जंगलाजवळ जाण्यास तसेच आपल्या प्राण्यांना या भागात मोकळे सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
From Kerala to Everest Base Camp on a one-wheeled bicycle: Kerala man takes on arduous challenge. You can call Sanit a veteran of such cycling challenges. He covered 7,000 kilometres from Kanyakumari to Kashmir on a modified bicycle, and has now set his sights even higher.… pic.twitter.com/jsZa4XrDOV — News Arena India (@NewsArenaIndia) August 19, 2026
‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही…’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral
हा व्हिडिओ @T_Investor_ नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हे बिचारे खच्चर (किंवा खेचर) आहेत, ज्यांना टांगेवाल्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. हे लोक सिमेंट आणि बांधकामाचे इतर साहित्य वाहून नेण्यासाठी त्यांचा वापर करतात आणि एकदा का हे प्राणी जखमी झाले की, एखाद्या ‘टॉयलेट पेपर’प्रमाणे त्यांना फेकून देतात. पाळीव असलेल्या या प्राण्यांना जंगलात किंवा मोकळ्या निसर्गात जगण्याची कोणतीही संधी नसते. खरोखरच दया येते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निसर्ग इतका क्रुर का आहे?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तो घोडा अगदी सहजपणे शरण आला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.