Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?’ चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

Video Viral : रायडरला थांबवून शाळकरी मुलाने केली अनोखा मागणी. चिमुकल्याची विनंती ऐकून रायडरही हादरला. व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये असून याला आतापर्यंत १ मिलिहून अधिकचे लाईक्स मिळाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 11:07 AM
'१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?' चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

'१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?' चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • शाळेतील फादर्स डे कार्यक्रमासाठी चिमुकल्याने Rapido रायडरला १० मिनिटांसाठी बाबा बनण्याची विनंती केली.
  • मुलाच्या निरागस बोलण्याने रायडर भावूक झाला आणि अखेर त्याच्यासोबत शाळेत जाण्यास तयार झाला.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मुलाच्या निरागसतेचे आणि रायडरच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
सोशल मिडियावर सक्रिय असल्यास इथे व्हायरल होणारे अनेक मजेदार व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. अलिकडे रॅपिडो रायडरचा एका व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक सात वर्षांचा चिमुकला रॅपिडो रायडरला एक खास विनंती करताना दिसली. आपल्या गोड आवाजात त्याने रायडरजवळ अशी काही मागणी केली की ऐकून सर्वच थक्क झाले. रायडरही मुलाची मागणी ऐकून अचंबित झाला. यादरम्यान त्यांच्यातील संभाषण व्हिडिओत कैद करण्यात आले असून मुलाने रायडरकडे नक्की कोणती मागणी केली ते चला जाणून घेऊया.

काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रायडर आणि शाळेत जाणाऱ्या मुलामधील एक संभाषण ऐकू येतो. आपल्या गाडीवरुन जात असताना रायडरला एक मुलगा आवाज देतो. मुलाने शाळेचा गणवेश घातलेला असतो आणि तो शाळेत जाण्याच्या तयारीत असतो. रायडर जेव्हा त्याला विचारतो की गाडी तू बुक केली आहे का तेव्हा मुलगा त्याच्याकडे एक वेगळीच विनंती करु लागतो.

मुलगा रायडरजवळ येतो आणि १० मिनिटांसाठी तुम्ही माझे बाबा व्हाल का? असा प्रश्न रायडरला करतो. रायडर हे ऐकून फार थक्क होतो. रायडर म्हणतो की, तुझी आई तर तिथे आहे तिला घेऊन जा. यावर मुलगा म्हणतो की, “आज माझ्या शाळेत फादर्स डे आहे. माझे बाबा कामावर आहेत. ते कधीच शाळेत येत नाहीत. जर माझ्या मित्रांना कळले की बाबा इथे नाहीत, तर ते मला चिडवतील.” यावर रायडर म्हणतो की, “मी तुझा बाबा झालो आणि कुणी मला पकडलं तर?” यावर मुलगा म्हणतो की, “शिक्षकांसमोर जाऊन फक्त हसा, बाकी सर्व मी बघून घेईन”. नंतर रायडर मुलाला म्हणतो की तुझ्या आईला तू शाळेत घेऊन जा ज्यावर मुलगा म्हणतो की फादर्स डे आहे ना तर सर्व मुलं वडिलांना घेऊन येतील. या सर्व संभाषणानंतर शेवटी रायडर मुलाचे वडिल बनून शाळेत जायला तयार होतो. मुलगा रायडरच्या राडीवर बसतो आणि ते दोघेही तिथून निघून जातात.

हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘वो अलग ही लेव्हल का बंदा था’

हा व्हिडिओ @rohitvlogster नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिकचे लाईक्स मिळाले आहेत. यूजर्स मुलाची निरागसता पाहून त्याच्यावर घायाळ झाले आणि कमेंट सेक्शनमध्ये सर्वच रायडरला त्याचा वडिल बनून जा रे अशी मागणी करताना दिसले. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “मुलाचा निरागसपणा खूपच छान दिसत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर बाबा पुढच्या वर्षी गेले, तर शाळेतले लोक आईबद्दल काय विचार करतील”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अशा वेळी वडिलांनी मुलांच्या सोबत उपस्थित असायसा पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rapido rider becomes father for 10 minutes after schoolboys emotional request video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Rapido
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral
1

काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral

हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘वो अलग ही लेव्हल का बंदा था’
2

हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘वो अलग ही लेव्हल का बंदा था’

शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास… मुलगी म्हणाली ‘अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा’
3

शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास… मुलगी म्हणाली ‘अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा’

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी चमत्कार? भरधाव ट्रेनची धडक बसूनही गाय उठून उभी; VIDEO Viral
4

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी चमत्कार? भरधाव ट्रेनची धडक बसूनही गाय उठून उभी; VIDEO Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.