Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“दु:ख ही प्रेमाची किंमत आहे, अलविदा माझ्या…” टाटांच्या निधनानंतर त्यांच्या सर्वात तरुण मित्राची भावुक पोस्ट Viral

रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. त्यातच आता टाटा यांच्या विश्वासू आणि घनिष्ठ मित्राची भावुक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात त्याने फार प्रेमळ आणि मार्मिक शब्दात आपले दुःख व्यक्त केले आहे. त्याची ही भावुक पोस्ट पाहून आता अनेकजण यावर आपली हळहळ व्यक्त करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 10, 2024 | 12:07 PM
"दु:ख ही प्रेमाची किंमत आहे, अलविदा माझ्या..." टाटांच्या निधनानंतर त्यांच्या सर्वात तरुण मित्राची भावुक पोस्ट Viral

"दु:ख ही प्रेमाची किंमत आहे, अलविदा माझ्या..." टाटांच्या निधनानंतर त्यांच्या सर्वात तरुण मित्राची भावुक पोस्ट Viral

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे काळ रात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात आता शोककळा पसरली आहे. राजकीय नेते, उद्योगपती ते खेळाडूंपर्यंत अनेक जण त्यांना आदरांजली वाहत आहेत. माहितीनुसार, आज 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या सोशल मेडिया अकाउंट्सवर हळहळ व्यक्त केली. सध्या रतन टाटा यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या एका तरुण मित्राने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रतन टाटा यांचे विश्वासू सहाय्यक, शंतनू नायडू यांनी रतन टाटा यांच्या निधनानंतर गुरुवारी एक पोस्ट शेअर केली. माहितीनुसार शंतनू हे त्यांच्या कामातील सर्वात तरुण कर्मचारी आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये टाटा यांना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणत आपले दुःख व्यक्त केले. त्यांनी आपल्या लिंक्डइन अकाउंटवर यासंबधीची एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. मुख्य म्हणजे, यात त्याने रतन टाटा आणि त्यांच्यातील व्यावसायिक नात्यावर नाही तर त्यांच्या सुंदर मैत्रीवर प्रकाश टाकला आहे.

हेदेखील वाचा – या व्हिडिओतून झाली होती सुरजच्या करियरला सुरुवात, टिकटॉकचा तो पहिला गोलीगत व्हिडिओ पुन्हा व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

शंतनू नायडू याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “या मैत्रीने आता माझ्यासोबत जी पोकळी सोडली आहे, ती भरून काढण्याच्या प्रयत्नात मी आयुष्यभर घालवणार आहे. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. अलविदा, माझ्या प्रिय दीपगृह (लाईटहाऊस)”. अशा प्रेमळ आणि भावनिक शब्दात शंतनूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण याच्या कमेंट्समध्ये हळहळ व्यक्त करत आहेत.

हेदेखील वाचा – पाकिस्तान ते पाकिस्तानच! विधानसभेत गदारोळ, आमदारांनी लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, Video Viral

रतन टाटा आणि शंतनूची मैत्री

शंतनू नायडू आणि रतन टाटा यांच्यातील मैत्री प्राण्यांच्या प्रेमातून सुरु झाली. 2014 मध्ये दोघांची मैत्री झाली. शंतनू यांनी भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराने प्रभावित होत रतन टाटा यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांंना आमंत्रित केले. अवघ्या 10 वर्षाच्या या प्रवासात शंतनू टाटांचे सर्वात विश्वासू आणि घनिष्ठ मित्र बनले.

Web Title: Ratan tatas assistant shantanu naidu shares goodbye post for national icon grief is the price to pay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • Ratan Tata
  • Ratan Tata Death
  • viral post

संबंधित बातम्या

‘Road to Success’ ला हास्याचा टच; B.Tech विद्यार्थ्याचा ‘असा’ हटके आणि विनोदी प्लॅन पाहून नेटिझन्स लोटपोट
1

‘Road to Success’ ला हास्याचा टच; B.Tech विद्यार्थ्याचा ‘असा’ हटके आणि विनोदी प्लॅन पाहून नेटिझन्स लोटपोट

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट
2

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट

VIRAL: ट्रम्प मरणार? ‘सिम्पसन’चे भाकित आणि राष्ट्राध्यक्ष बेपत्ता, सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ, व्हाईट हाऊस चिंतेत
3

VIRAL: ट्रम्प मरणार? ‘सिम्पसन’चे भाकित आणि राष्ट्राध्यक्ष बेपत्ता, सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ, व्हाईट हाऊस चिंतेत

श्रद्धेचा अद्भुत चमत्कार! काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर आढळला पांढरा घुबड; इवलेसे डोळे, गोंडस रूप अन् मनमोहक Photo Viral
4

श्रद्धेचा अद्भुत चमत्कार! काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर आढळला पांढरा घुबड; इवलेसे डोळे, गोंडस रूप अन् मनमोहक Photo Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.