सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात मात्र सध्या एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये नुकताच एक गदारोळ झाला, जेव्हा खैबर पख्तुनख्वा विधानसभेत आमदार आणि समर्थकांमध्ये जोरदार लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन आमदार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की काही लोकांमध्ये जोरदार भांडण होत आहे. एका आमदाराने जेव्हा एका कॅबिनेट मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी हाणामारी सुरू केली.
हेदेखील वाचा – लड्डू मुत्त्यानंतर आता आलेत ‘पिस्तुल्या बाबा’, भक्तांना गोळी घालून देतात आशीर्वाद, Viral Video पाहून हसू आवरणार नाही
गेल्या मंगळवारी खैबर पख्तूनख्वा विधानसभेत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. दरम्यान, केपी मुख्यमंत्र्यांचे मदतविषयक विशेष सहाय्यक नेक मोहम्मद दावर यांच्या समर्थकांनी दक्षिण वझिरीस्तानमधील पीटीआय आमदार इक्बाल वझीर यांच्या विरोधात अपशब्द वापरले आणि त्यांना धमकावले. मात्र, दोन दिवसांपूर्वी मोहम्मद दावर आणि इक्बाल वजीर यांच्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वाद सुरू होता, परिणामी त्यांचे समर्थक विधानसभेतच एकमेकांना भिडले आणि मारहाण करू लागले.
मोहम्मद दावर आणि इक्बाल वझीर यांच्या समर्थकांनी विधानसभेच्या सभागृहातच हाणामारी सुरू केली. त्यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी दोन्ही बाजूच्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. त्यामुळे बराच वेळ हा संघर्ष सुरू होता. आश्चर्याची बाब म्हणजे जोपर्यंत सभापती विधानसभेत उपस्थित होते तोपर्यंत दोन्ही खासदार आपापसात वाद घालत होते, मात्र सभापती सभागृहातून बाहेर येताच वजीरने नेक मोहम्मद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि मारहाण करायला सुरवात केली.
In the Pakistan’s Khyber Pakhtunkhwa Assembly, clashes broke out between government and opposition members, with both sides resorting to kicks and punches, resulting in torn clothes. pic.twitter.com/NnYSlRe6kq
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) October 8, 2024
हेदेखील वाचा – एक चायवाला दिवसाला किती पैसे कमावतो? व्हिडिओतील कमाई पाहून आवाक् व्हाल, डिग्री द्याल फाडून …
दरम्यान आता या सर्व घटनेचा व्हिडिओ @Ghulam Abbas Shah नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या कॅप्शनमध्ये, पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा विधानसभेत सरकार आणि विरोधी सदस्यांमध्ये हाणामारी झाली, दोन्ही बाजूंनी लाथा-बुक्क्या झाल्या, परिणामी कपडे फाटले असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकजण यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडत आहेत.