Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganpati Festival 2026: चिमुकल्यांचा भन्नाट ‘बाल्या डान्स’! गणरायासमोर धरला ठेका, खेडमधील VIDEO व्हायरल

Ganpati Festival 2026: गणपती बाप्पाचा उत्सव आणि कोकणातील बाल्या डान्स हे एक वेगळचं नातं आहे. कोकणची समृद्ध सांस्कृतिक ओळख असलेले एक पारंपारिक लोक आहे. अशाच एक चिमुकल्यांनी सादर केलेला पारंपरिक ‘बाल्या डान्स’ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 17, 2026 | 06:10 PM
चिमुकल्यांचा भन्नाट ‘बाल्या डान्स’! गणरायासमोर धरला ठेका, खेडमधील VIDEO व्हायरल

चिमुकल्यांचा भन्नाट ‘बाल्या डान्स’! गणरायासमोर धरला ठेका, खेडमधील VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • पारंपरिक वेशभूषा अन् तालावर ठेका!
  • चिमुकल्यांनी सादर केला ‘बाल्या डान्स’
  • सोशल मीडियावर कौतुक
Ganpati Festival 2026: गणपतीच्या काळात कोकणात ढोलकीचा ठेका, घुंगरांचा नाद, आणि गणा धाव रे मला पाव रे.. सारख्या पारंपरिक गणांच्या सुरांवर बाल्या डान्स पाहायला मिळतो. कणातील गणेशोत्सव म्हटलं की गणरायाची भक्ती, गावागावातील जागरण, भजन-कीर्तन आणि पारंपरिक लोककलांची रेलचेल पाहायला मिळते. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही गणेशोत्सवाची मोठी धूम सुरू आहे. याच उत्सवी वातावरणात काही चिमुकल्यांनी सादर केलेला पारंपरिक ‘बाल्या डान्स’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

गणरायासमोर चिमुकल्यांचा ठेका

गणपती बाप्पासमोर आयोजित जागरणाच्या कार्यक्रमात मोठ्यांसोबत लहान मुलांनीही सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून चिमुकल्यांनी तालावर ठेका धरत बाल्या डान्स सादर केला. त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि तालबद्ध हालचाली पाहून उपस्थितांनीही त्यांना भरभरून दाद दिली.

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

कोकणच्या लोककलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न

कोकणातील गणेशोत्सवाला धार्मिक महत्त्वाबरोबरच सांस्कृतिक परंपरेचीही मोठी जोड आहे. गावागावातील गणेशोत्सवात भजन, कीर्तन, पारंपरिक नृत्य, खेळ आणि विविध लोककलांचे कार्यक्रम पूर्वीपासून सादर केले जातात.

काळानुसार मनोरंजनाची साधने बदलली आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढला. त्यामुळे काही पारंपरिक लोककला नव्या पिढीपासून दूर जात असल्याची चिंता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत लहान मुलांनी या कला आत्मसात करून सादर करणे हे कोकणच्या सांस्कृतिक वारशासाठी सकारात्मक चित्र ठरत आहे.

सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

खेडमधील चिमुकल्यांच्या बाल्या डान्सचा व्हिडिओ उपस्थितांपैकी कुणीतरी मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच अनेकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. मुकल्यांचा उत्साह आणि पारंपरिक नृत्य पाहून नेटकऱ्यांकडूनही कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणची लोककला नव्या पिढीकडे हस्तांतरित होत असल्याचे या व्हिडिओतून अधोरेखित होत आहे.

परंपरेला सोशल मीडियामुळे नवी ओळख

पूर्वी गाव आणि परिसरापुरत्या मर्यादित राहणाऱ्या अशा लोककलांना आता सोशल मीडियामुळे मोठे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. गावातील एखाद्या जागरणात सादर झालेली कला काही वेळातच हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते.

गणरायाच्या साक्षीने चिमुकल्यांनी सादर केलेल्या या बाल्या डान्समुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला असून, कोकणच्या पारंपरिक लोककलेला नव्या पिढीच्या माध्यमातून नवी ओळख मिळताना दिसत आहे.

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Web Title: Ratnagiri khed children traditional balya dance during ganeshotsav video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!
1

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!

Ambani Antilia Ganeshotsav Special Menu: अंबानींच्या गणपतीचा थाटच निराळा; स्पेशल मेन्यूची सोशल मीडियावर चर्चा
2

Ambani Antilia Ganeshotsav Special Menu: अंबानींच्या गणपतीचा थाटच निराळा; स्पेशल मेन्यूची सोशल मीडियावर चर्चा

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
3

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
4

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.