Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यात एक कोकणी माणूस एकदम स्टाईलमध्ये उभा आहे. तिकीट तर त्याने कधीच बुक केलंय, कन्फर्म पण झालंय. बॉस नाही म्हणाला तरी मी जाणारच, असा त्याचा अॅटिट्यूड आहे. हा मीम बघून प्रत्येक कोकणी माणसाला आपलीच गोष्ट वाटेल.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
बॉस म्हणतो “काम खूप आहे, सुट्टी नाही मिळणार”. हे ऐकल्यावर कोकणी माणसाच्या डोक्यात काय चालू असेल? मीममध्ये दाखवलंय की तो सरळ राजीनामा द्यायच्या विचारात आहे. आणि हे खरंच घडतं, कित्येक लोक गणपतीसाठी नोकरी सोडायला पण तयार होतात. गणपतीसाठी काही पण!
View this post on Instagram
अर्ज करून 4 दिवस झाले, बॉस काही बोलतच नाही. ना हो म्हणतोय ना नाही म्हणतोय. अशा वेळी त्या माणसाची जी घालमेल होते, ती या मीममध्ये एकदम परफेक्ट दाखवली आहे. ना धड कामात लक्ष, ना घरी लक्ष, फक्त टेन्शन.
View this post on Instagram
सुट्टी फायनली मिळाली.कित्येक वेळा बॉसच्या मागे लागून, विनंती करून शेवटी सुट्टी मिळाली. आता त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. तो आता स्वप्नातच गावी पोहोचलाय. एसटीत बसलोय, गावची वाट, घरचा गणपती, सगळं त्याच्या डोळ्यासमोर येतंय.आणि एक मीम आहे ज्यात बॉसने सुट्टी नाकारल्यावर मनात येणारे विचार दाखवले आहेत. सगळे प्लॅन केले होते, गावी जाऊन धमाल करायची होती, पण बॉसने सगळ्यावर पाणी फिरवलं. त्या वेळी येणारी उदासी आणि राग, दोन्ही या मीममध्ये दिसतं.
View this post on Instagram
बॉसने ऐनवेळी सुट्टी दिल्यावर खात्री नव्हती की सुट्टी मिळेल, पण शेवटच्या क्षणी बॉस म्हणाला “जा बाबा, तू पण गावी जा”. तेव्हा जो आनंद होतो ना, तो शब्दात सांगता येणार नाही. त्या मीममध्ये तोच आनंद दाखवलाय.खरं तर हे मीम्स जरी गंमतीत बनवले असले तरी प्रत्येक चाकरमान्याची हीच खरी कहाणी आहे. गणपतीसाठी गावी जाणं म्हणजे फक्त सुट्टी नाही, ती आपल्या मातीसाठीची ओढ आहे.
View this post on Instagram
Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!






