Viral Video: बाइकवर फिरताना अचानक समोर आला भयावह प्राणी, तरुणांचा उडाला थरकाप, पाहूनच अंगावर काटा येईल
या जगात विविध प्रकारचे प्राणी अस्तित्वात आहेत. असे काही प्राणी आहेत ज्यांना लोक पसंत करतात, त्यांना त्यांच्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि काही लोक त्यांच्याबरोबर त्यांचा व्यवसाय देखील करतात. पण या जगात असे काही प्राणी आहेत ज्यांना कोणी पाहिल्यास आधी त्यांचे भान सुटते, मग त्यांना घाम फुटतो आणि त्यानंतर ते जीव वाचवण्यासाठी प्रार्थना करू लागतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून असेच काहीसे होताना दिसून येत आहे. रस्त्यावर बाइक चालवत फिरणाऱ्या तरुणांना अचानक समोर एक जीवघेणा प्राणी दिसला त्यानंतर काय घडले ते आता तुम्हीच पहा.
दरम्यान सोशल मीडियावर नेहमीच काही थरारक आणि जीवघेण्या प्राण्यांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. त्यांची चपळता आणि शिकार पाहून अनेकदा माणसांनाही त्यांची भीती वाटू लागते. असे प्राणी समोर दिसले की साहजिक प्राण्यांचीच काय तर माणसांचीही पळताभुई एक होते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला हैराण करतील.
हेदेखील वाचा – करोडोंची कार चालवत मारत होता श्रीमंतीच्या गप्पा तेवढ्यात गेला तोल, गाडीचा चक्काचूर अन् थरकाप उडवणारा Video Viral
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन मित्र रात्री बाईकवरून कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे. ते रस्त्यावर वळताच त्यांना एक धोकादायक गोष्ट दिसू लागते, त्यांनतर त्याच्या चेहऱ्यावरील भीती आपल्याला व्हिडिओतून स्पष्ट दिसून येते. खरंतर त्यांच्यासमोर एक सिंह उभा असतो. सिंहाला सर्वात धोकादायक आणि जीवघेण्या प्राण्यांपैकी एक मानले जाते. सिंहाला पाहताच क्षणार्धात ते दोघेही तिथून पळू लागतात. यावेळी ते इतके घाबरतात की आपली बाईकदेखील तिथून न घेता सुसाट तिथून धूम ठोकतात. यावेळी रस्त्यावर उभा असलेला श्वानदेखील आपले प्राण वाचवण्यासाठी जोरात पळू लागतो.
यांनतर सिंह मात्र हे सर्व दृश्य शांत नजरेने पाहत राहतो. व्हिडिओच्या शेवटी सिंह हळूहळू सर्व पळाले त्या दिशेने जाताना दिसून येतो. ही सर्व घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील सोमनाथ येथील एका निवासी भागातील आहे. इथे हा सिंह नक्की कुठून आणि कसा आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.
Damn💀
pic.twitter.com/p6Q0yW9Nv3— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 10, 2024
हेदेखील वाचा – “दु:ख ही प्रेमाची किंमत आहे, अलविदा माझ्या…” टाटांच्या निधनानंतर त्यांच्या सर्वात तरुण मित्राची भावुक पोस्ट Viral
हा व्हायरल व्हिडिओ @Ghar Ke Kalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सिंह सध्या मूडमध्ये नाही. म्हणूनच जर ते जगले नसते तर त्यांना कोणीही वाचवू शकले नसते, त्यांनी देवाचे आभार मानले पाहिजेत, ते खूप भाग्यवान आहेत” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “परिस्थिती इतकी बिघडली की त्यांनी दुचाकी तिथेच थांबवली आणि तेथून पळ काढला”.