भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे काळ रात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात आता शोककळा पसरली आहे. राजकीय नेते, उद्योगपती ते खेळाडूंपर्यंत अनेक जण त्यांना आदरांजली वाहत आहेत. माहितीनुसार, आज 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या सोशल मेडिया अकाउंट्सवर हळहळ व्यक्त केली. सध्या रतन टाटा यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या एका तरुण मित्राने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रतन टाटा यांचे विश्वासू सहाय्यक, शंतनू नायडू यांनी रतन टाटा यांच्या निधनानंतर गुरुवारी एक पोस्ट शेअर केली. माहितीनुसार शंतनू हे त्यांच्या कामातील सर्वात तरुण कर्मचारी आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये टाटा यांना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणत आपले दुःख व्यक्त केले. त्यांनी आपल्या लिंक्डइन अकाउंटवर यासंबधीची एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. मुख्य म्हणजे, यात त्याने रतन टाटा आणि त्यांच्यातील व्यावसायिक नात्यावर नाही तर त्यांच्या सुंदर मैत्रीवर प्रकाश टाकला आहे.
हेदेखील वाचा – या व्हिडिओतून झाली होती सुरजच्या करियरला सुरुवात, टिकटॉकचा तो पहिला गोलीगत व्हिडिओ पुन्हा व्हायरल, तुम्ही पाहिलात का?
शंतनू नायडू याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “या मैत्रीने आता माझ्यासोबत जी पोकळी सोडली आहे, ती भरून काढण्याच्या प्रयत्नात मी आयुष्यभर घालवणार आहे. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. अलविदा, माझ्या प्रिय दीपगृह (लाईटहाऊस)”. अशा प्रेमळ आणि भावनिक शब्दात शंतनूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण याच्या कमेंट्समध्ये हळहळ व्यक्त करत आहेत.
हेदेखील वाचा – पाकिस्तान ते पाकिस्तानच! विधानसभेत गदारोळ, आमदारांनी लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, Video Viral
शंतनू नायडू आणि रतन टाटा यांच्यातील मैत्री प्राण्यांच्या प्रेमातून सुरु झाली. 2014 मध्ये दोघांची मैत्री झाली. शंतनू यांनी भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराने प्रभावित होत रतन टाटा यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांंना आमंत्रित केले. अवघ्या 10 वर्षाच्या या प्रवासात शंतनू टाटांचे सर्वात विश्वासू आणि घनिष्ठ मित्र बनले.