किंग कोब्राच्या वाटेला जाणं पडलं महागात, पुढे जाताच असा दंश केला की जंगलाच्या राजा तडफडून तडफडून... थरारक Video Viral
जंगलाचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे, त्याच्या ताकदीमुळे जंगलातील सर्वच प्राणी त्याला घाबरून असतात. पण तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, प्रत्येक शेरला एक सव्वाशेर हा मिळतोच. आताच्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडून आल्याचे दिसून आले आहे. घमंड हा चांगला नसतोच अनेकदा आपला घमंड आपल्या जीवनाचा शेवट करण्यास कारणीभूत ठरतो. आपल्या ताकदीचा घमंड करत सिंह किंग कोब्रा समोर जातो खरा पण त्याच्या वाटेला जाण त्याला इतकं महागात पडत की इथेच त्याचा शेवट होतो. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
जंगलाचा राजा सिंह आणि किंग कोब्रा हे दोन्ही जंगलातील धोकादायक शिकारी आहेत अशात जेव्हा हे दोन्ही शिकारी आमने-सामने येतात तेव्हा मृत्यू हा अटळ आहेच. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिंह काही करेल याआधीच कोब्रा मृत्यूचा असा खेळ खेळतो की सिंहाला काही समजेल त्याआधीच त्याचा शेवट झालेला असतो. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक कोब्रा सिंहाच्या वाटेत आडवा येत असल्याचे दिसते. त्याला पाहताच सिंह रागाने गर्जना करतो आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे जाऊ लागतो मात्र किंग कोब्रा तो काही करेल याआधीच आपला विषारी दंश त्याला मारतो ज्यांनंतर सिंहाची अवस्था खराब होऊ लागते. व्हिडिओत आपण पाहू शकतो, यात सिंह जमिनीवर पडत आपल्या जीवनाचे शेवटचे क्षण मोजताना दिसून येतो. त्याचे शरीर तडफडत असते आणि असहाय्य होऊन तो जमिनीवर पडतो आणि यातच त्याचा मृत्यू होतो. एकंदरीतच सिंहाची ही अवस्था अनेकांच्या अंगावर काटा आणण्यासारखी आहे.
ताकत हर जगह काम नहीं आती 😢
😢😢😢 pic.twitter.com/y159OIL6ao
— riya pathak (@riyapathak123) July 9, 2025
व्हिडिओ आपल्याला अनेक गोष्टी समजावून जातो, प्रत्येक वेळेला ताकद महत्त्वाची नसते, प्रत्येक प्राण्याची स्वतःची खासियत असते आणि कोणीही कमकुवत नसतो हे यातून दिसून येते. हा व्हिडिओ @riyapathak123 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे. कल्पना करा की एका सुंदर सिंहाने तासनतास इतका त्रास सहन केला आणित्याचे चित्रीकरण केले जात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोन्ही वेगळे व्हिडिओ आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या बिचाऱ्या सिंहाची अवस्था कशी झाली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.