(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर अनेक धक्कादायक व्हिडिओज इथे व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असेल. आजूबाजूच्या घटनांचे तसेच काही मजेदार तर काही थक्क करणारे व्हिडिओज इथे नेहमीच शेअर केले जातात. माणसांचेच काय प्राण्यांचीही बरेच व्हिडिओ इथे शेअर केले जातात जे लोक आवडीने बघतात. याद्वारे आपल्या प्राण्यांचे जीवन आणखीन जवळून पाहता येते. अशातच एका वयोवृद्ध हत्तीणीच्या शेवटच्या काळातील एक व्हिडिओ सध्या फार चर्चेत आहे. या हत्तिणीचे वय १०९ वर्ष होते आणि ती आशियातील सर्वात वयस्कर हत्ती मानली जात होती. अखेर तिचा शेवट जवळ आलाच होता. तिच्या मृत्यूपूर्वी व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे ज्यात सर्वांनाच तिचे शेवटचे दर्शन घडले.
कोण होती ही हत्तिणी?
या वयोवृद्ध हत्तिणीचे नाव वत्सला होते आणि मंगळवारी पन्ना व्याघ्र प्रकल्पात मृत्यू झाला. ती १०० वर्षाहून अधिक काळ जगली. व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वत्सलाचे अंतिम संस्कार केले. वत्सला हत्ती पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र होती आणि सर्वात वयस्कर असल्याने ती संपूर्ण हत्तींच्या गटाचे नेतृत्व करत असे. न्ना व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून तिच्या मृत्यूची बातमी समजली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘इतर मादी हत्तीणींच्या प्रसूतीनंतर आणि बाळाच्या जन्मानंतर ती आजीची भूमिका बजावत असे.’ पन्ना व्याघ्र प्रकल्पाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की, मादी हत्तीणी वत्सला हिनौटा रेंजच्या खैरैयान नाल्याजवळ तिच्या पुढच्या पायाचे नखे तुटल्यामुळे बसली होती. त्यानुसार, वन कर्मचाऱ्यांनी तिला उचलण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु
दुपारी मादी हत्तीणी वत्सलाचा मृत्यू झाला.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात वत्सला थकलेल्या अवस्थेत एका खुल्या मैदानावर उभी असल्याचे दिसून येते. लहान डोळे आणि शरीरावर वृद्धत्वाच्या खुणा यावेळी स्पष्टपणे झळकत होत्या. तिच्याकडे पाहून कदाचित तिला आपला शेवट जवळ आला आहे माहिती झाल्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. सोंड जमिनीवर टेकलेली आणि डोळे हळूहळू बंद होत असल्याचेही यात दिसून येते. व्हिडिओतील हे दृश्ये हृदयस्पर्शी असून युजर्स आता वत्सलाच्या जाण्याचा शोक व्यक्त करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






