Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक अन् थेट मृत्यूचे दार! बिहारमधील रेल्वे कर्मचाऱ्याचा बोगी आणि इंजिनमध्ये चिरडून मृत्यू, धक्कादायक Video Viral

बिहारमधील बरौनी जंक्शन येथे एक दुर्दैवी घटना घडून आली आहे. रेल्वे चालकाच्या चुकीमुळे रेल्वे कर्मचाऱ्याचा अक्षरशः चिरडून मृत्यू झाला. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 10, 2024 | 10:10 AM
एक चूक अन् थेट मृत्यूचे दार! बिहारमधील रेल्वे कर्मचाऱ्याचा बोगी आणि इंजिनमध्ये चिरडून मृत्यू, Video Viral

एक चूक अन् थेट मृत्यूचे दार! बिहारमधील रेल्वे कर्मचाऱ्याचा बोगी आणि इंजिनमध्ये चिरडून मृत्यू, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

ट्रेन हा अनेकांच्या आयुष्याचा एक जीवनावश्यक साधन बनला आहे. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करत असतात. यादरम्यान बऱ्याचदा काहींचे अपघात देखील घडून येतात. चढताना उतरताना किंवा गर्दीत असे काही प्रकार घडतात की लोकांना आपला जीव गमवावा लागतो. ट्रेन अपघातांचे अनेक प्रकरण रोज समोर येत असतात. यात अपघातांत काही गंभीर जखमी होतात तर काहींचा जागीच मृत्यू होतो. सध्या अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कोणत्या प्रवाशाचा नाही तर रेल्वे कर्मचाऱ्याचा अत्यंत वाईट अवस्थेत मृत्यू झाल्याचे दिसून येते.

बिहारमधील बरौनी जंक्शन येथे शनिवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मृत्यूचा हा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्याला पाहून अनेकजण हादरले आहेत. जंक्शनवर बोगी आणि इंजिन वेगळं करत असताना कामगाराचा इंजिन आणि बोगीमध्ये चिरडून मृत्यू झाल्याचे यातून समजत आहे. माहितीनुसार, सुमारे दोन तास तो इंजिन आणि बोगीमध्ये अडकून होता. त्याच्या मृत्यूचा हा थरारक व्हिडिओ पाहून आता अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

हेदेखील वाचा – अजबच! 4 लाखांचा खर्च अन् 1500 लोकांच्या उपस्थितीत कुटुंबाने आपल्या लकी कारचे केले अंत्यसंस्कार, Video Viral

सदर घटना शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास घडून आली. ही घटना बिहारमधील आहे. स बरौनी जंक्शन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर घडली. समस्तीपूर जिल्ह्यातील दलसिंगसराय येथील रहिवासी असलेले अमर कुमार जे रेल्वे कर्मचारी होते, ते लखनौ-बरौनी एक्स्प्रेसचे इंजिन जोडण्याचा प्रयत्न करत होते; जी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आली. प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि अमर कुमार इंजिन जोडत असताना चालकाने चुकून समोरच्या दिशेने जाण्याऐवजी उलट दिशेने ट्रेन हलवली आणि त्याची एक चूक या कर्मचाऱ्याला थेट मृत्यूच्या दारात घेऊन गेली.

⚠️ Sensitive Visual ⚠️ बिहार : बेगूसराय के बरौनी जंक्शन पर बोगी और इंजन के बीच दबकर रेलवेकर्मी अमर कुमार राउत की मौत हो गई। वो करीब 2 घंटे तक ऐसे ही दबा रहा। DRM ने हादसे की जांच के आदेश दिए हैं। pic.twitter.com/lEbUMyz742 — Sachin Gupta (@SachinGuptaUP) November 9, 2024

हेदेखील वाचा – देवासारखे धावून आले! बैलाने महिलेवर हल्ला चढवताच काकांनी केलं असं… थरारक लढतीचा Video Viral

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे आता प्रवासी आणि मृताच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या दुर्दैवी घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “रेल्वे व्यवस्था एवढी बिकट आहे की, माणूस दोन तास मृत्यूनंतरही अडकून राहिला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बेफिकीर राहिल्यास जीवनाची शाश्वती नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Terrifying railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 10:08 AM

Topics:  

  • Railway Accident
  • shocking video viral

संबंधित बातम्या

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral
1

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
2

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video
3

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

शिक्षिका आहे की हैवान? एका विद्यार्थ्याला कानाखाली मारलं, दुसऱ्याला उलटं लटकवलं ; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral
4

शिक्षिका आहे की हैवान? एका विद्यार्थ्याला कानाखाली मारलं, दुसऱ्याला उलटं लटकवलं ; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.