संत आणि ऋषींनी समाधी घेतल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, पण तुम्ही कधी गाडी समाधी घेताना पाहिली किंवा ऐकली आहे का? ऐकले नसेल तर आत्ताच ऐका आणि स्वतःच्या डोळ्यांनी पहा. कारण सोशल मीडियावर या अजब प्रकारचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कुटुंबाने आपल्या लकी कारवर अंत्यसंस्कार केल्याचे दिसून येत आहे. ही घटना गुजरातमधील आहे. व्हिडिओतील अजब गजब दृश्ये पाहून आता युजर्स मात्र फार थक्क झाले आहेत.
गाडी बिघडली तर ती दुरुस्त करून देतो, रद्दी झाली तर विकतो, पण गुजरातमधील एका कुटुंबाने असे काही न करता खड्डा खोदून गाडीचे अंत्यसंस्कार केले. हे अनोखे प्रकरण गुजरातमधील अमरेली येथील आहे, जिथे एका कुटुंबाने 10 फूट खोल खड्डा खणून त्यांची भाग्यवान कार पुरली आणि नंतर मोठ्या थाटामाटात 1500 लोकांसाठी मेजवानी आयोजित केली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च करण्यात आला.
हेदेखील वाचा – देवासारखे धावून आले! बैलाने महिलेवर हल्ला चढवताच काकांनी केलं असं… थरारक लढतीचा Video Viral
गुरुवारी लाठी तालुक्यातील पदरशिंगा गावात संजय पोलारा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संत आणि अध्यात्मिक नेत्यांसह सुमारे 1,500 लोक उपस्थित होते. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पोलारा आणि त्याचे कुटुंब त्याच्या शेतात विधी करत असल्याचे दाखवण्यात आले. यात त्यांच्या 12 वर्षांच्या वॅगन आरसाठी एक 15 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. फुलांनी आणि हारांनी सजवलेली कर घरापासून त्याच्या शेतापर्यंत मोठ्या थाटामाटात नेण्यात आली, उतारावरून खाली आणली गेली आणि खड्ड्यात गाडली गेली. गाडी हिरव्या कपड्याने झाकलेली होती आणि कुटुंबातील सदस्यांनी पूजा करून आणि पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून गाडीला निरोप दिला.
गाडीचे मालक संजय पोलारा म्हणाले की, मी ही कार सुमारे 12 वर्षांपूर्वी खरेदी केली होती आणि या कारमुळे कुटुंबात समृद्धी आली. व्यवसायात यशाबरोबरच माझ्या कुटुंबालाही मान मिळाला. ही कार माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरली. त्यामुळे हिला विकण्याऐवजी मी तिला श्रद्धांजली म्हणून माझ्या शेतात पुरले. येणाऱ्या पिढ्यांना याची माहिती मिळावी यासाठी समाधी स्थळी वृक्षारोपणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘लकी’ कार को कबाड़ में देने की बजाय दफनाया:
मालिक ने भोज और विधि-विधान से विदाई दी, 4 लाख रुपए खर्च किए….!!गुजरात…
गाड़ी केवल एक साधन नहीं बल्कि इमोशन भी है. एक शख्स ने अपनी सालों पुरानी कार का अंतिम संस्कार किया है. कहा कि कार लकी थी तो उसे बेचना नहीं चाहता है. इसलिए अपने… pic.twitter.com/1qNcRgFYlH
— Vikash Mohta (@VikashMohta_IND) November 9, 2024
हेदेखील वाचा – बेंगळुरूच्या KGF मध्ये अवघ्या 5 सेकंदात दुमजली इमरतीचा झाला चुराडा, धडकी भरवणारा Video Viral
ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ माजवत आहे. याचा व्हिडिओ @VikashMohta_IND नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या विचित्र घटनेवर अनेकांनी आपले मत मांडत व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही घटना खरोखरच रंजक आणि अनोखी आहे! ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कार हे केवळ वाहन नसून ती भावना देखील आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.