आरशाची कमाल, जंगलात माजली धमाल! स्वतःचेच प्रतिबिंब पाहून अस्वल झाला कावराबावरा; थेट आरसा उचलला अन्... Video Viral
मानव कितीही प्रगत झाला असला तरी प्राण्यांचे आयुष्य तितके आधुनिक नाही. हेच कारण आहे की प्राणी जेव्हा मानवनिर्मित उपकरणे पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात जंगलातील एका अस्वलाने पहिल्यांदाच आरसा पाहिल्याचे दृश्य दिसून येते. आपला चेहरा पाहण्यासाठी आपण आरशाचा वापर करतो, यात आपले प्रतिबिंब दिसून येते. आपल्यासाठी हा आरसा एक साधी गोष्ट असला तरी प्राण्यांसाठी ती गूढतेने भरलेली गोष्ट आहे. अस्वल जेव्हा पहिल्यांदा आरशात आपले प्रतिबिंब बघतो तेव्हा तो खूप घाबरतो आणि मग असे काही करतो की ज्याने संपूर्ण जंगलच हादरून जाते. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक अस्वल जंगलात विहार करताना दिसून येतो. अशात पुढे जाताना अचानक त्याच्यासमोर एक आरसा त्याला दिसतो ज्याला पाहताच त्याला त्यात आपले प्रतिबिंब दिसू लागते. अस्वलाने पहिल्यांदाच आरशात आपले प्रतिबिंब पाहिल्याने तो लगेच ते पाहून घाबरतो आणि भीतीत सुरुवातील त्या आरशापासून दूर पळतो. पण नंतर धैर्य एकवटून तो आरशासमोर जातो अन क्षणातच तो आरसा हाताने उखडून त्याला जमिनीवर मारून तोडू लागतो. क्वचित त्याला आरशात आपलेच प्रतिबिंब आहे हे समजले नसावे आणि यात कोणी दुसरा अस्वल दडून बसला आहे असे त्याला वाटले असावे ज्यामुळे क्षणाचाही विलंब न करता तो स्वतःच्याच प्रतिबिंबावर हल्ला करतो आरशाला मुळासकट तोडून फेकून टाकतो. अस्वलाची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून लोक त्याचा हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत. मानवनिर्मित गोष्ट जेव्हा प्राण्यांशी इंटरॅक्ट करतात तेव्हा काय घडत ते आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळत.
हा व्हायरल
Animal’s funny moments 🧵🧵🧶
Don’t miss the thread.1. Bro saw himself for the first time on a mirror 🪞 pic.twitter.com/upUKe1QhPu
— Earth_Seeker (@Earth_Seeker1) August 22, 2025
व्हिडिओ @Earth_Seeker1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अस्वलाचे वेडेपणा शिगेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अस्वल लगेच हल्ला करायला निघाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो स्वतःलाच घाबरला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.