Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! तरुणाने चाकू-नेलकटरसह चाव्यांचा गुच्छ गिळला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

एखाद्या गोष्टीचे वेड आपल्या कसे जीवावर बेतू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही व्हायरल बातमी. इथे गेमच्या आहारी जाऊन एका तरुणाने चक्क जीवघेण्या वस्तू गिळून टाकल्या. याचे मूळ कारण ऐकताच डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य: ABP )

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 27, 2024 | 10:28 AM
धक्कादायक! तरुणाने एक चाकू, नेलकटर आणि चाव्यांचा गुच्छ गिळला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

धक्कादायक! तरुणाने एक चाकू, नेलकटर आणि चाव्यांचा गुच्छ गिळला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. सोशल मीडियावरील अनेक गोष्टी कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. ही बातमी ऐकून नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन हदरेल. बिहारमधील एका तरुणाने चक्क चाकू, नेलकटरसह एक संपूर्ण चाव्यांचा गुच्छ गिळला आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक युजर्सना त्याने असे का केले असा गहन प्रश्न पडला आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

काय आहे प्रकरण?

बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे 22 वर्षीय तरुणाच्या पोटातून चाकू, नेल कटर आणि कपाटाची की चेन शस्त्रक्रियेने काढण्यात आली आहे. हे प्रकरण मोतिहारी शहरातील चांदमारी परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ मोबाइलवर गेम खेळण्याच्या व्यसनामुळे तरुणाच्या मानसिक स्थितीवर असा परिणाम झाला होता की, अचानक त्याच्या मनात सुपर ह्युमन बनण्याची इच्छा जागृत झाली. यानंतर तरुणाने एक एक करत सर्व गोष्टी गिळायला सुरुवात केली.

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईलवरील जादूगाराचा गेम आणि PUBG सारख्या अनेक धोकादायक गेममुळे प्रभावित होऊन या तरुणाने स्वतःला अशाच प्रकारे साचेबद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच या धोकादायक गेममध्ये त्याचा जीव अडकला. आश्चर्यची बाब म्हणजे, इतके सर्व गिळल्यानंतरही त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. दरम्यान, घरच्यांनी गोदरेज अलमिराची चावी शोधली असता ती सापडली नाही, त्यांनी मुलाची विचारपूस केली असता त्याने चावी पोटात असल्याचे सांगितले.

हेदेखील वाचा – क्षणार्धात मच्छरांचा खातमा करते ही मशीन, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट Video

कुटुंबीयांना तरुणाच्या म्हणण्यावर विश्वास बसला नाही तरीही त्यांनी तातडीने याची शहानिशा करण्यासाठी जवळील खासगी रुग्णालयात तरुणाला दाखल केले. डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी अल्ट्रासाऊंड प्रक्रिया पूर्ण केली आणि यातून पोटात धातूसारखे असल्याचे स्पष्ट झाले. तरुणाच्या जीवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, त्यामुळे ऑपरेशन करून पोटातून चाकू, नेल कटर आणि चावीची चेन बाहेर काढण्यात आली, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुदैवाने तरुणाला काहीही झालेले नसून आता त्याची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे.

आमच्यासाठी ही धक्का देणारी सर्जरी होती, आणि तरुणाला मानसिक आजार असून त्यासंदर्भाती औषधोपचार देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेने आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवली असून अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

 

Web Title: The young man swallowed a knife a nail cutter and a bunch of keys

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • bihar

संबंधित बातम्या

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral
1

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.