गेल्या काही दिवसांपासून मच्छरांचे प्रमाण फार वाढले आहे. त्यात पावसाळा ऋतू देखील सुरु झाला आहे. या ऋतूत मच्छरांचा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढू लागतो. संध्याकाळ होताच घरामध्ये मच्छरांचा शिरकाव सुरू होतो. अनेकदा या मच्छरांमुळे गंभीर रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या मच्छरांना रोखण्यासाठी बाजारात अनेक नवनवीन उपकरणे मिळतात. अगदी मॉस्किटो रॅकेटपासून पार इलेक्ट्रिक कॉईलपर्यंत आणि मच्छर अगरबत्तीपासून मॉस्केटो क्रिम पर्यंत असंख्य पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. मात्र तरीही यातील कोणताही पर्याय 100% काम करतो असे आपण म्हणू शकत नाही.
मुंबईत पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच पार्शवभूमीवर, महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये घरातील डास ओळखून नष्ट करू शकणारे मशीन दाखवण्यात आले आहे. हे यंत्र एका चिनी व्यक्तीने बनवले असून महिंद्राने याचे वर्णन ‘घराचे आयरन डोम’ असे केले आहे.
हेदेखील वाचा – ‘भारतात येऊ नका…’; लाल लेहेंग्यात विदेशी महिलेने शेअर केला Video; एकदा पहाच
आर्यन डोम ही एक सुरक्षा प्रणाली आहे. या टेक्नोलॉजीचा वापर युद्धामध्ये केला जातो. यामध्ये एक एअर डिफेन्स सिस्टम असते. त्यामुळे शत्रूनं जर हवेतून हल्ला केला तर त्वरीत आपल्याला माहिती मिळते आणि आपण त्या हल्ल्याला परतवण्यासाठी तयारी करू शकतो. तर याच मशीनचे मिनी मॉडेल एका चीनी तरुणाने तयार केले आहे.
With dengue on the rise in Mumbai, I’m trying to figure out how to acquire this miniature cannon, invented by a Chinese man, which can seek out & destroy mosquitoes!
An Iron Dome for your Home…
— anand mahindra (@anandmahindra) August 24, 2024
हे मशीन आता मच्छर मारण्यासाठी वापरले जाईल. तुम्ही जर हे मशीन खरेदी केलं तर तुम्हीदेखील हवेतल्या हवेत मछरांचा खातमा करू शकता. आंनद महेंद्रा यांनी आपल्या एक्स अअकाउंटवर या मशीनचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी, “मुंबईत डेंग्यू वाढत असताना, एका चिनी माणसाने शोधून काढलेली ही सूक्ष्म तोफ कशी मिळवायची, जी डास शोधून नष्ट करू शकते हे शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे!” असे लिहिले आहे. अर्थात आनंद महेंद्रा ही मशीन मिळवण्याचा प्रयत्न करत असून अद्याप ही मशीन त्यांच्या हाथी आलेली नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार कमी वेळेत तुफान व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक युजर्सने यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक युजर्सने मुंबईतील वाढत्या डेंग्यूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी आनंद महिंद्रा यांच्या या हटके कल्पनेचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा! शोधाच्या बाबतीत चीन खूप पुढे आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्ही मला अब्जाधीश व्यवसायाची कल्पना दिली आहे.”