'हा भारत आहे, पाश्चिमात्य देश नाही, सँडविच देणे बंद करा', महिला सीईओची पोस्ट व्हायरल; विमान कंपन्यांना केले निवेदन
सध्या मानवाच्या अनेक गोष्टींमध्ये बदल होत आहेत. विज्ञान तंत्रज्ञानापासून खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये देखील बदल दिसून येत आहे. भारतात तर अनेक पाश्चिमात्त पदार्थांचे सेवन वाढले आहे. पण काही असे लोक आहेत ज्यांना आजही आपले भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडतात. या लोकांचे म्हणणे आहे की, आपली भारतीय खाद्यसंस्कृती नष्ट होत चालली आहे. अशातच यासंबंधी एक पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिला सीईओने भारतीय विमान कंपन्यांना निवेदन केले आहे की, प्लाईटमध्ये सॅंडविच, बर्गर यांसारखे पदार्थ न देता आपला भारतीय नाष्टा देण्यात यावा.
फ्लाइटमध्ये मिळणाऱ्या पॅकेज फूड्सवर टीका
फ्लाइटमधील प्रवासादरम्यान दिल्या जाणाऱ्या अन्नाबद्दल सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी त्यांच्या पोस्टमधून फ्लाइटमध्ये मिळणाऱ्या पॅकेज केलेल्या सँडविच सारख्या पदार्थांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, हा भारत आहे, पाश्चिमात्य देश नाही. भारतीय खाद्यपदार्थांच्या विविधतेचा उल्लेख करत, त्या म्हणाल्या की आमच्याकडे असे अनेक चविष्ट, पौष्टिक आणि दीर्घकाळ टिकणारे पर्याय आहेत जसे की पराठा, इडली, ढोकळा इत्यादी, ज्यांचा वापर फ्लाइटमध्ये करता येऊ शकतो.सीईओ राधिका गुप्ता यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राधिका गुप्ता यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळवला आहे. त्यांच्या पोस्टला 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. गुप्ता यांच्या मते, भारतीय मतांनी उरलेल्या भाज्यांपासून बनवलेले पराठा रोल अत्यंत स्वादिष्ट असतात आणि त्यांचा विचार फ्लाइटमधील खाद्यपदार्थ म्हणून केला पाहिजे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या चर्चेत उत्साहाने भाग घेतला. काहींनी फ्लाइटमध्ये मिळणारे अन्न आरोग्यदायी नसल्याचे नमूद केले, तर काहींनी घरून अन्न आणून खाण्याचा सल्ला दिला.
व्हायरल पोस्ट
I am calling for an end to airlines and makers of boxed food who serve two pieces of bread stuffed with cheese and coleslaw (veg sandwich) in the name of breakfast.
This is India not the West. We have amazing breakfast food from across the country – parantha, idlis, dhoklas,…
— Radhika Gupta (@iRadhikaGupta) September 21, 2024
युजर्सने केल्या आपल्या प्रतिक्रीया व्यक्त
एका सोशल मीडिया यूजरने लिहिले आहे की, एअरलाइनमधील कोणतेही अन्न हेल्दी दिले जात नाही. घरून अन्न आणून खाणे चांगले आहे. तर आणखी एकाने लिहिले की, आमच्याकडे नाश्त्याचे विविध पर्याय आहेत, त्यामुळे एअरलाइन्सने खरोखर चांगले काम केले पाहिजे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की पोहे हा सर्वोत्तम नाश्ता आहे, त्याचे नाव विसरता कामा नये. तर आम्हाला खायला पराठा आहे याचा आनंद व्हायला हवा, सँडविच संग्रहालयात ठेवायला हवे. असेही एका युजरने म्हटले आहे. तसेच काहींनी म्हटले आहे की, हेच रेल्वेलाही लागू होते, इथला नाश्ता खूप कंटाळवाणा आहे. कटलेट ब्रेड किंवा ब्रेड ऑम्लेट सारखे. अनेकांनी तुम्ही खूप चांगला विषय मांडला आहे, खरंच फ्लाइटमध्ये योग्य जेवण का मिळू नये. बहुतेक पदार्थ असे असतात की ते बहुधा फायदेशीर नसतात. असे सांगितले आहे.