लगता है बहुत गहरा याराना है! अनेक वर्षांनी झाली भेट, गळाभेट घेतली थेट; दोन मगरींचा Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला धक्का देतात तर कधी आश्चर्यचकित करून टाकतात. अशात नुकताच इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो वन्य प्राण्यांच्या जीवनाशी निगडित असून यातील दृश्यांनी आता लोकांना हादरवून सोडले आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये दोन मगरी चालू रस्त्यावर गळाभेट करताना दिसून आल्या. मगरींच्या या कृतीने सर्वांना धक्का बसला आणि ते फार काळानंतर एकमेकांना भेटले असावेत असा अंदाज लोकांनी लावायला सुरुवात केली. त्यांचे हे उत्साहवर्धक प्रेम पाहून सर्वच अचंबित झाले आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली.
काय घडले व्हिडिओत?
मगर हा जंगलातील सर्वाधिक धोकादायक प्राणी आहे. हा प्राणी अधिकतर पाण्यात आढळला जातो ज्यामुळे त्याला पाण्याचा राक्षस ही उपमा देण्यात आली आहे. मात्र नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हा पाण्याचा राक्षस गळाभेट करताना दिसला. शिकाऱ्याच्या हा अनोखा व्हिडिओ पाहून सर्वच थक्क झाले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे, दोन मगरी एकमेकांसमोर उभे राहून आणि एकमेकांना मिठी मारताना दिसून येत आहेत. भररस्त्यात सुरु असलेला हा प्रकार इतका दुर्लभ असतो की दुरूनच वाहनचालक आपली वाहने थांबवत हे दृश्य पाहू लागतात. दृश्य थायलंडमधील एका रस्त्यावर घडून आल्याचे सांगण्यात येत आहे.
मगरींची ही गळाभेट @nowthis नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो लोकांनी या व्हिडिओला लाइक्स देत व्हिडिओवर आपली पसंती दर्शवली आहे. तसेच बऱ्याच जणांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला ते भांडताना दिसत नाहीये. त्यांना पाहून प्रेम हवेत किंवा रस्त्यावर असल्यासारखे वाटते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मगरींचा गुण पाहता ते एकमेकांना खाणार असे वाटते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.