(फोटो सौजन्य: X)
सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट आणि चकीत करणारा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लग्नसमारंभातील आहे, पण यामध्ये जे घडले, त्याने उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्यच धक्का दिला. हा प्रकार ओडिशातील भुवनेश्वर शहरात घडला असून, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
भोपाळमधील या लग्नाच्या समारंभात सर्वकाही नीट सुरु असते मात्र पुढच्याच क्षणी हा सोहळा एक नाट्यमय वळण घेते. पारंपरिक वाजंत्री, सजलेला मांडव, हसऱ्या पाहुण्यांचा गोंगाट आणि मंगलाष्टकांच्या सुरात सुरू असलेला विवाह अचानक गोंधळात बदलतो, जेव्हा नवऱ्याची गर्लफ्रेंड पोलीस घेऊन लग्नमंडपात पोहचते. प्रेयसीने उघडपणे आरोप केला की, नवऱ्या मुलाने तिला लग्नाचे वचन दिले होते. दोघांमध्ये एकेकाळी प्रेमसंबंध होते, पण अचानक तो तिला दुर्लक्षित करून दुसऱ्या मुलीशी लग्न करत असल्याचे तिला समजले. त्यामुळेच तिने हा निर्णय घेतला आणि पोलीस घेऊन लग्नमंडपात दाखल झाली.
Woman disrupts wedding reception in Bhubaneswar, accuses groom of betrayal#odisha #Bhubaneswar pic.twitter.com/93FSXrf1Ch
— Karthick Chandrasekar (@kart997) May 13, 2025
या प्रकारामुळे क्षणातच मांडवात प्रचंड गोंधळ उडाला. काही वेळातच मांडवात धक्काबुक्की सुरू झाली आणि वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला. व्हिडिओमध्ये काही लोक एकमेकांना मारत असल्याचे दृश्य दिसून आले. एकंदरीत मुलीच्या या धाडसी पावलाने संपूर्ण लग्नात नाट्यमय वळण घेतले. सुदैवाने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणतात. या सर्व प्रकारामुळे मुलीकडचे आणि मुलाकडचे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु होते आणि हे लग्न काही वेळासाठी थांबवले जाते. उपस्थित पाहुणेही हा सर्व गोंधळ पाहून चकित होतात. हा सर्व प्रकार आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत असून हा व्हिडिओ @kart997 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.