(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, दोन मुली आपापसात वादात गुंतलेल्या असताना, एक दुसऱ्याच्या केसांना धरून ओढतात. सुरूवातीला हे एक साधं भांडण वाटत असलं तरी, दुसऱ्या क्षणात, आणखी एक मुलगी अचानक त्या दोघांच्या भांडणात सामील होते. हेच इथे थांबत नाही; व्हिडिओत दाखवलेल्या घटनेत, दोन मुली एकमेकांवर जमिनीवर पडून लढताना आणि एकमेकांचे केस ओढताना दिसतात. सर्व जणी एकमेकींवर तुटून पडलेल्या असतात. या भांडणाची सुरुवात एक बॉयफ्रेंडमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मुलींची भांडणं सुरु असताना तिथे तिसरी आणि मग आणखीन दोन मुली या भांडणात सामील होतात. अशा प्रकारे एकाच वेळी पाच मुली एकमेकांवर हल्ला करत असतात, कोणी केस ओढत तर कोणी चापट मारतात. हा सर्वच प्रकार रस्त्यावर घडल्यामुळे अनेकजण ते पाहून हादरल्याचे दिसून आले. काहींनी तर हे दृश्य आपल्या फोनमध्ये कैद केले.
Peak-Male content kinda Kalesh: pic.twitter.com/cF4ORyFZzG — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 23, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एक लक्षात घेण्यासारखी आहे की स्त्रिया मारामारीत कधीच मुक्का मारत नाहीत.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाकीची मुलं तिथून निघून जात होती, यावरून भांडणाचे गांभीर्य दिसून येते” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “यांना बिग बॉसमध्ये पाठवायला हवं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






