(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका ब्राझिलियन व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे. यात ब्राझिलियन गिटारिस्ट गंगा घाटावर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेत आपला गिटार वाजवताना दिसतो. समोर त्याने आपल्या फोनचा कॅमेरा सुरु केलेला असतो आणि हे दृश्य तो यात कैद करत असतो. याचवेळी एक स्थानिक त्याला असं करताना पाहतो आणि तोही या गाण्याचा आनंद लुटू लागतो. स्थानिकाच्या मनातील इच्छा पाहता गिटारिस्ट त्याला त्याच्यासोबत व्हिडिओमध्ये सामील होण्याचे आमंत्रण देतो ज्यानंतर व्हिडिओची रंगत आणखीन वाढते. गिटारच्या तालावर व्यक्ती बेधुंद होऊन नाचू लागतो. व्यक्तीचा आनंद पाहून गिटारिस्टही खुश होतो आणि आनंदाने आपला गिटार वाजवत राहतो. वेगळी भाषा, वेगळी संस्कृती पण गाण्याच्या एका सुराने दोन व्यक्तींना एकत्र केलं जे पाहणं सर्वांसाठी मजेदार ठरलं.
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून याला @indians नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काकांना चांगला डान्स येतो, त्यांनी गाण्याच्या लयनुसार नृत्य सादर केले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान व्हिडिओ आहे हा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय टॅलेंट आहे, खूप छान”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






