
कधीही न पाहिलेलं दृश्य, चीनने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड! एकाच वेळी 1600 ड्रोन आकाशात उडवले अन् पाहून सर्वच झाले थक्क; Video Viral
तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्याला कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. जग जसजस पुढे जात आहे तसतसे नवनवीन चमत्कार आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. जग एआयमध्ये उंची गाठत असतानाच चीनने नवीन पराक्रम करुन दाखवला आहे ज्याने सर्वांचेच डोळे दिपले. रंगीबेरंगी दिव्यांनी प्रकाशित झालेल्या हजारो ड्रोनचा हा देखावा पाहण्यासारखा होता. हे दृश्य कुणालाही डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटेल असेच होते. ते पाहून असं वाटतं आहे की, जणू कोणत्या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे आणि याची सर्वात मोठी खासियत म्हणजे आकाशात उडवण्यात आलेले हे ड्रोन्स मानवनिर्मित नसून ते एआय प्रणालीद्वारे नियंत्रित केले जात होते.
चीनने पुन्हा एकदा ड्रोन उडवण्याचा स्वतःचाच जागतिक रेकाॅर्ड मोडला आहे. यावेळी चीनने एकाच वेळी तब्बल 1600 ड्रोन आकाशात लाँच करुन एक नवीन इतिहास रचला. यातील खास गोष्ट म्हणजे हे सर्व ड्रोन्स हे स्मार्ट एआय सिस्टमद्वारे नियंत्रित केले जात होते. याचे दृश्य फारच नेत्रदीपक होते. चीनच्या हुनान प्रांतातील लिउयांग शहरात हे दृश्ये दिसून आले. या शो दरम्यान, ड्रोनने आकाशात विविध आकार आणि सुंदर डिझाइन तयार केले. एका क्षणी त्यांनी फुलांचा आकार बनवला, तर दुसऱ्या क्षणी ते चिनी ध्वजात रूपांतरित झाले.
चीन ने एक स्मार्ट AI सिस्टम द्वारा नियंत्रित, 16,000 AI-संचालित ड्रोनों को एक साथ उड़ान भरकर खुदका ही विश्व रिकॉर्ड तोड़ दिया है। यह हुनान के लिउयांग में हुआ, जिसे “Home of Fireworks” के रूप में जाना जाता है। pic.twitter.com/ZLPhLN5m6c — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) November 6, 2025
ड्रोन कोडद्वारे एआय सिस्टमशी जोडलेले असतात.
वृत्तानुसार, हा संपूर्ण कार्यक्रम चीनच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचा एक भाग होता, ज्यामध्ये देशाच्या तंत्रज्ञानाचे आणि क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले. ड्रोन शो चालवणाऱ्या अभियंत्यांनी सांगितले की प्रत्येक ड्रोन वेगळ्या कोडचा वापर करून एआय सिस्टमशी जोडलेला होता, ज्यामुळे सर्व ड्रोन एकाच वेळी योग्य दिशेने उड्डाण करत होते. लोक हे दृश्य पाहून थक्क झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आणि त्याला जगातील सर्वात सुंदर एआय शो म्हटले. चीनकडे पूर्वी ५,००० ड्रोनसह हा विक्रम होता, परंतु आता तो अनेक पटींनी वाढला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.