(फोटो सौजन्य: Instagram)
पावसाळा ऋतू आता संपला आहे, ज्यामुळे सगळीकडे आत लगीनसराईला सुरुवात झाली आहे. लोकं शुभ मुहूर्त पाहून विधिवत लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. आता लग्न म्हटलं की, गंमत-जंंमत, डान्स आणि काही अनोखे पराक्रम घडून येणारच. बहुतेक लग्नात पाहुणेमंडळी काही ना काही पराक्रम करुन दाखवत असतात पण नुकताच हा पराक्रम एका वराने आपल्याच लग्नात करुन दाखवला आहे. नुकताच इंटरनेटवर एक अतरंगी व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात पाठवणीच्या वेळी गाडीत वर वधू आणि त्याची मेव्हणी बसल्याचे दिसून येते. अशातच वर वराने यावेळी रील बनवण्याचा निर्णय घेतला. मुख्य म्हणजे ही रील त्याने आपल्या मेव्हणीसोबत बनवली. गाडीच्या पुढच्या सीटवर बसून तो मागच्या सीटवर बसलेल्या मेव्हणीकडे टकामका बघत तिला व्हिडिओमध्ये दाखवत होता हे पाहून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनेकांना वराचे लक्षण चांगले नसल्याचेही म्हटले. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये, वर-वधूचे लग्न पार पडले असून पाठवणीची तयारी सुरु असल्याचे दिसते. चारचाकीमध्ये वर वधू आणि काही पाहुणीमंडळी एकत्र बसली आहेत आणि ते सर्व घरी जाण्याच्या तयारीत असतात. गाडीमध्ये नवरा ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला असतो. त्याच्या मागच्या सीटवर नववधू आणि मेव्हणी बसलेली असते. अशात नवरा कॅमेरा चालू करुन आपल्या फोनमध्ये व्हिडिओ शूट करायला सुरुवात करतो. फ्रेममध्ये तो स्वतःवर आणि मग मेव्हणीवर फोकस ठेवतो. हे पाहून मेव्हणीही थक्क होते आणि क्षणातच आपली मान दुसऱ्या दिशेला फिरवते. तो पुन्हा पुन्हा मेव्हणीकडे कॅमेरा वळवून तिच्याकडे हसून बघू लागतो. व्हिडिओमध्ये वधू मात्र कोपऱ्यात बसलेली असते पण या व्हिडिओत तिला घेतले जात नाही. हे सर्व पाहून यूजर्स आता नाराज झाले आहेत. वराचे लक्षण चांगले नाही अशी प्रतिक्रिया आता लोक व्हिडिओला देत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @_epic69 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, कोणास ठाऊक ती त्याची बहीण असू शकते… ती तिच्या वहिनीला घेऊन येत असेल… फक्त व्हिडिओ पाहून मला आनंद झाला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला दोन निळ्या ड्रमची गरज आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “याच्या अंगातले किडे पाहून याला वधूची नाही तर शत्रूची गरज आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






