Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये पब्लिक शोमध्ये डान्स करताना रोबोटने लहान मुलाच्या कानशिलात हाणली, नक्की घडलं काय? Video Viral

Robot Slaps Boy : रोबोटलाही सहन होईना, लाईव्ह पब्लिक शो दरम्यान थेट चिमुकल्याच्याच कानशिलात हाणली. चीनमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2026 | 11:51 AM
चीनमध्ये पब्लिक शोमध्ये डान्स करताना रोबोटने लहान मुलाच्या कानशिलात हाणली, नक्की घडलं काय? Video Viral

चीनमध्ये पब्लिक शोमध्ये डान्स करताना रोबोटने लहान मुलाच्या कानशिलात हाणली, नक्की घडलं काय? Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • शांक्सी प्रांतातील शोमध्ये G1 ह्युमनॉइड रोबोट नृत्य करताना अचानक नियंत्रणाबाहेर गेला.
  • हात हलवताना रोबोटचा हात एका लहान मुलाच्या गालावर लागून त्याला थप्पड बसली.
  • घटनेनंतर रोबोट लगेच नियंत्रणात आणण्यात आला; व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
तंत्रज्ञान आपल्याला नवनवीन चमत्कारांनी आश्चर्यचकित करत आहे आणि यातीलच एक म्हणते रोबोट्स वाढते प्रमाण. मानवांप्रमाणेच दिसणाऱ्या रोबोट्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चीन-जपान सारख्या देशांमध्ये यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येते. मानवाच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेले हे रोबोट्स काही बाबतीत मानवाहून अधिक चांगले काम करत असले तरी त्यांच्या कामाची पूर्ण शाश्वती देता येत नाही. तांत्रिक बिघाडामुळे रोबोट नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असते आणि अलिकडे अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चीनमधील असल्याचे सांगण्यात येत असून यात रोबोटने एका चिमुकल्याला थप्पड मारल्याचे दिसून आले.

एक विवाह ऐसा भी! तीन वर्षांपूर्वी महिलेने नदीसोबत केलं लग्न, आता साजरी करतेय एनिव्हर्सरी… अनोख्या लव्हस्टोरीचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

चीनच्या शांक्सी प्रांतात एका पब्लिक शो दरम्यान रोबोट सर्वांसोबत काही कर्तब किंवा नृत्य सादर करत होता. हा युनिट्री रोबोटिक्सचा प्रसिद्ध G1 ह्युमनॉइड रोबोट होता. पण असं करत असताना अचानक तो तोल सोडून प्रेक्षकांच्या दिशेने वळू लागला आणि जोरजोरात आपले हात हलवू लागला. असं करत असतानाच त्याचा हात एका लहान मुलाच्या गालाला लागला आणि त्याला नकळत का होईना पण कानशिलात थप्पड बसली. या घटनेनंतर रोबोटच्या चालकांनी लगेच त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान माहितीनुसार, रोबोटचे वजन अंदाजे ३५ किलोग्रॅम आणि किंमत अंदाजे १३,५०० डॉलर्स असल्याचा दावा केला जात आहे.

Robot uprising also start small, maybe a slap here, a kick there. All to desensitize humans. pic.twitter.com/qpa8yfkIcF — The Great Translation Movement 大翻译运动 (@TGTM_Official) March 22, 2026

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral

हा व्हिडिओ @TGTM_Official नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडिओला १३ हजाराहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये हा रोबोट संगीताच्या तालावर गिरक्या घेताना आणि हातांनी जोरदार हालचाली करताना दिसत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात एक प्रात्यक्षिक सुरू असताना, रोबोट गर्दीच्या दिशेने गिरकी घेत आला. त्याचे पसरलेले हात थेट एका मुलाच्या चेहऱ्यावर आदळले. ज्यानंतर मुलाने लगेच आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला. मुलाच्या प्रकृतीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु व्हिडिओमध्ये तो रडताना दिसत आहे. या घटनेनंतर सोशल मिडियावर मात्र आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एका युजरने लिहिले आहे, “जर तुम्ही Unitree Robotics च्या IPO अर्जाची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली असतील, तर हे दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चीनमध्ये ० स्वायत्त, ताठ उभे राहणारे मानवाकृती रोबोट आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरेरे, बिचारा… आयोजकांनी त्या मुलाच्या सुरक्षिततेची तातडीने खात्री केली पाहिजे!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Video viral humanoid robot hits child in china public show viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • China
  • Robots
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral
1

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
2

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral
3

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral
4

लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.