(फोटो सौजन्य: X)
माहितीनुसार, या प्राध्यापकाचे नाव मोहम्मद अब्दुल असे आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, प्राध्यापक म्हणताना दिसतात की, “मला या बॅचकडून इतकं प्रेम मिळालं आहे की मी स्वतःला रोखू शकत नाही. मला तुमच्या बॅचमधील सर्वात महत्त्वाच्या मुलींपैकी एकाला प्रपोज करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण बॅचला चॉकलेट्स वाटायची आहेत.” त्यानंतर ते वर्गात बसलेल्या विद्यार्थिनीला म्हणाले, “माझं तुझ्यावर प्रेम आहे.” मग जेव्हा प्राध्यापक व्यासपिठावरुन खाली येतात तेव्हा मुलगी त्यांनी जाब विचारते. प्राध्यापकांनी दावा केला की, त्या विद्यार्थिनीने त्यांच्यावर प्रेम व्यक्त केले होते आणि त्यांच्याकडे त्याचा पुरावा होता. प्राध्यापक त्या मुलीला म्हणाले, “तू मला ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं नाही का सांगितलंस?” विद्यार्थिनीने विचारले, “मी तुला कधी मागणी घातली?” प्राध्यापकांनी उत्तर दिले, “सीसीटीव्ही फुटेज आहे.” जेव्हा मुलीने त्यांना पुरावा दाखवण्यास सांगितले, तेव्हा प्राध्यापक म्हणाले, “मी तुझ्याशी उद्या बोलेन,” पण मुलीने नकार दिला. त्यानंतर प्राध्यापकांनी वर्गातील इतरांना आधी चॉकलेट खाण्यास सांगितले आणि ते निघून गेले.
A professor at Siddhartha Medical College in Karnataka’s Nelamangala proposed to one of his students in the classroom, and later claimed that the woman had proposed to him first. The woman rejected his proposal and sought proof of his claims. The professor was later thrashed by… pic.twitter.com/CaU9NqWrpg — Vani Mehrotra (@vani_mehrotra) March 26, 2026
अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा
या घटनेची बातमी पसरल्यानंतर, संस्थेतील इतर विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी प्राध्यापकाला जाब विचारला. दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये, विद्यार्थी प्राध्यापकाला मारहाण करताना दिसत आहेत, तर एक विद्यार्थिनी त्यांना चपलेने मारतानाही यात दिसून आले आहे. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये पार्क केलेल्या त्यांच्या गाडीपर्यंत प्राध्यापकाचा पाठलाग करतात आणि मग त्यांना मारहाण करु लागतात. जखमी प्राध्यापक कसा बसा तिथून आपला पळ काढतो. सांगण्यात येत आहे की, घटनेची माहिती मिळताच प्रिंसिपलने प्राध्यापकाला निलंबित केले. पोलिसांनी प्रोफेसरविरोधात एफआयआर देखील दाखल केली आहे. दरम्यान या घटनेचे फुटेज आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केले जात असून शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या खळबळ उडाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






