
पहिल्यांदाच झालं असावं! मुंगूसाला मारताच विजयाचा आनंद साजरा करू लागला किंग कोब्रा, असा नाचला की सर्व पाहतच राहिले; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, एक मुंगूस मृत्यूमुखी होऊन जमिनीवर पडला आहे. मुंगूसाच्या मागेच साप मोठ्या ऐटीत उभा असून तो आपल्या शत्रूचा खातमा करुन फार आनंदित असल्याचे स्पष्ट होते. साप मुंगूसावर अनेक वार करतो आणि आपल्या शरीराला डोलवत तो विजयाचा आनंद साजरा करतो. मुंगूसाला हरवल्यानंतर सापाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. नाचणाऱ्या कोब्राचा हा अनोखा अंदाज अनेकांना थक्क करण्यासारख्या आहे. कोब्राचा हा अनोखा अंदाज पाहून आता यूजर्स चांगलेच आश्चर्यचकित झाले असून या व्हिडिओला आता अनेक सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर करण्यात येत आहे.
सांप और नेवले की कहानी भारत और pa*किस्तान जैसी हैं जिसमें सांप कभी भी नेवले को नहीं मार सकता जैसे pa*किस्तान भारत को नहीं हरा सकता 🤣 pic.twitter.com/PiKGUlIdFv — SHANKAR LAL SHARMA (@sk_sharma21) December 21, 2025
हा व्हिडिओ @sk_sharma21 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुंगूस आधीच मरुन पडलाय तो जिवंत असता तर सापाची काही खैर नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे अगदी खरे आहे, प्रत्यक्ष जीवनात आणि चित्रपटांमध्येही. त्यांची स्पर्धा जुनी आहे जी अखंड सुरू आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दोघेही पक्के शत्रू आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.