Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराज, जरा बाजूला!’ रस्त्यातच बौद्ध भिक्षूंना अडवून खोडकर हत्तीने वसूल केला टोल, गोंडस दृश्य अन् Video Viral

Elephant Video Viral : गजराजाचा खोडकरपणा तर पहा... रस्त्याने जाताना बौद्ध भिक्षु काय दिसले, हत्तीने लगेचच त्यांचा रास्ता अडवला आणि टोल वसुली करायला सुरुवात केली. युजर्सने मजेदार कमेंट्स करत हत्तीला दरोडेखोर म्हटले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2026 | 10:14 AM
‘महाराज, जरा बाजूला!’ रस्त्यातच बौद्ध भिक्षूंना अडवून खोडकर हत्तीने वसूल केला तोल, गोंडस दृश्य अन् Video Viral

‘महाराज, जरा बाजूला!’ रस्त्यातच बौद्ध भिक्षूंना अडवून खोडकर हत्तीने वसूल केला तोल, गोंडस दृश्य अन् Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंना पाहताच हत्ती थांबतो आणि त्यांच्याकडे टोलची मागणी करतो.
  • भिक्षु मनाचा मोठेपणा दाखवत त्याला अन्न खाऊ घालतात.
  • निसर्गाचा खजिनदार म्हणत आता युजर्सने व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.
सोशल मिडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात जे कधी आपल्याला हसवतात तर कधी आश्चर्यचकित करतात. इथे बऱ्याचदा हत्तीचेही अनेक रंजक व्हिडिओज शेअर केले जात असतात. हत्ती शरीराने मोठा असला तरी त्याची खोडकर वृत्ती अनेकदा त्याला खास बनवत असते. हत्तीच्या अशाच एका खोडकरपणाचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात तो बौद्ध भिक्षूंना रस्त्यावर थांबवून त्यांच्याकडून टोल वसूली करताना दिसून आला. हे दृश्य पाहताना फारच गोंडस दिसत होते ज्यामुळे कमी वेळातच व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा! फोनची बॅटरी तोंडात टाकताच झाला भीषण स्फोट, तरुण जखमी; घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक गजराज तोंडात पाला घेऊन रस्त्याने जाताना दिसतो. याचवेळी त्याला बाजूने काही बौद्ध भिक्षू जाताना दिसतात. त्यांना पाहताच गजराज थांबतो आणि त्यांच्याजवळ एकटक नजरेने पाहत राहतो, जणू त्याला त्यांच्याकडून काहीतरी हवं आहे. भिक्षूंना गजराजाची भावना समजते आणि लगेच आपल्या हातात असलेल्या भांड्यातून त्याच्या सोंडेत अन्न ठेवू लागतात. हत्ती ते अन्न खातो आणि मग पुन्हा पाला आपल्या तोंडात पकडून पुढे निघून जातो. हत्तीच्या चतुरपणाची आता सोशल मिडियावर चर्चा केली जात असून त्याने रस्त्यावरुन जात असल्याचा एकप्रकारे टोल वसूल केला आहे असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे.

Elephant collects toll fee from passerby Buddhists 🐘😄 pic.twitter.com/Df87ekOD0B — Nature is Phenomenal (@AnimalGeoLife) February 7, 2026

हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

हत्ती आणि भिक्षूमधील हा मूक संवाद @AnimalGeoLife नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतिहासातील सर्वात भव्य टो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ तो एक प्रकारचा दरोडाच होता. त्या भिक्षूंनी ते अन्न मिळवण्यासाठी तासभर फिरण्यात घालवले होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हत्ती: निसर्गाचे अनपेक्षित खजिनदार”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video viral an elephant stopped buddhist monks on the road to collect toll viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Elephant Video
  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.