
Baby चा फोन येताच आईने मुलीच्या कानशिलात लगावली थप्पड, पण सत्य काही वेगळंच; उघड होताच... Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मुलगी बेडवर झापल्याचे दिसते आणि याचवेळी तिच्या फोनवर एक काॅल येतो. यावेळी मुलीची आई तिथेच उपस्थित असते, ज्यामुळे फोनवर आलेला काॅल आई कुणाचा आहे पाहण्यासाठी जाते आणि यात तिला बेबी हे नाव दिसते. आता मुलीच्या फोनवर बेबी नावाच्या व्यक्तीचा काॅल पाहताच आईला तिच्यावर शंका येते. आई मुलीला कानशिलात लगावत तिला झोपेतून उठवते आणि म्हणते की, काय झोपत आहेस, हा कुणाचा फोन येत आहे, हा बेबी कोण आहे. मुलगी यावर हा तुझा फोन आहे असे उत्तर देते ज्यानंतर आईच्या लक्षात येते की हा तर बेबी आत्याचा फोन आहे. मुलगी हे ऐकताच आईकडे रागाने पाहते ज्यावर आई पुन्हा तिच्या कानशिलात लगावून तिला भांडी घासायला जा म्हणून सांगते. व्हिडिओतील हा सर्व प्रकार पाहून आता यूजर्सना हसू अनावर झाले आहे.
अरे बापरे! फळ आहे की सोनं? 10 कोटींचा सफरचंद सर्वत्र ठरलाय चर्चेचा विषय; नक्की काय खास आहे यात?
हा व्हायरल व्हिडिओ @gungun__gusain नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कृपया तिला मारू नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं तर हास्यास्पद आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असं फक्त भारतीय आई करू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.