(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेकदा प्राण्यांचेही रंजक व्हिडिओ शेअर केला जातात आणि आताही इथे असेच काहीसे घडून आले. इंटरनेटवर सध्या एका चोरीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती मोरणीची नजर चुकवून तिची अंडी चोरण्याचा विचार करत असतो पण तितक्यातच मागून दुसरा मोर उडी मारतो आणि व्यक्तीला त्याच्या चुकीची शिक्षा देतो. अंडी चोरणाऱ्या या चोराला मोराने घडवलेली अद्दल पाहून यूजर्स खुश झाले आहेत. चला व्हिडिओतील दृश्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
अरे बापरे! फळ आहे की सोनं? 10 कोटींचा सफरचंद सर्वत्र ठरलाय चर्चेचा विषय; नक्की काय खास आहे यात?
व्हिडिओत काय घडलं?
व्हायरल होत असल्ल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, एका मोकळ्या जागेत एक मोर तिच्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची देखरेख करत असते आणि याचवेळी एक व्यक्ती गुपचूप येऊन तिची ही अंडी चोरण्याचा प्रयत्न करु लागतो. व्यक्तीचा हा पराक्रम दुसरा मोर मागूनच पाहत असतो. व्यक्ती अंडी घेणार तितक्यातच तो त्याच्यावर उडी मारून हल्ला करतो आणि व्यक्तीला अंड्यापासून दूर राहण्याचा इशारा देतो. मोराचा संताप व्हिडिओत स्पष्ट दिसून येतो. व्यक्ती या हल्ल्यात फार दूरवर जमिनीवर कोसळला जातो, त्याला दुखापतही झाली असावी. मोराच्या नखांनी आणि चोचीने तो माणूस गंभीर जखमी झाला आणि बराच अंतरावर पडला. अंड्यांजवळ मोर पाहून त्या माणसाने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अखेर पळून जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी मुलाच्या संरक्षणासाठी आई-वडीलच ढाल बनतात ही गोष्ट या घटनेतून स्पष्ट होते.
हा व्हायरल व्हिडिओ @beautiffulgram_to नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मोरणी दोन ते तीन अंडी घालते आणि मोर तिच्या जवळ जात नाही. हा व्हिडिओ चुकीचा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोघेही मोर आहेत. अंडी आधीच लावलेली दिसतात. संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक नियोजन करून शूट केल्याचे दिसते. लाईक्स आणि डॉलर्ससाठी काहीही करण्याची प्रवृत्ती सोशल मीडियाची विश्वासार्हता कमी करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा खूप छान”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






