
"मी गोरा तर मुलं सावळी कशी?"! जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral
बाळाचा जन्म हा त्याच्या आईवडिलांसाठी जगातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो पण नुकताच सोशल मिडियावर एक हादरवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात महिलेची नुकतीच प्रसुती झाल्याचे दिसते. महिलेला दोन जुळी मुलं होतात पण त्यांचा रंग पाहताच वडिलांना इतका राग येतो की रुग्णालयातच तो आपल्या पत्नीला डाफरायला सुरुवात करतो. हा सर्वच हाय व्होल्टेज ड्रामा आता इंटरनेटवर व्हायरल झाला असून याची कडी भारताशी जोडलेली आहे. आता हे कसे ते चला जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
व्हिडिओतील ही घटना अमेरीकेमध्ये घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. यात आपल्याला दिसते की, एक महिला रुग्णालयात आपल्या दोन नवजात मुलांना घेऊन बेडवर लेटली आहे. याच क्षणी तिचा नवरा आपल्या मुलांचा चेहरा पाहायला येतो पण त्यांचा रंग पाहूनच त्याच राग ओसांडून बाहेर पडतो. तो रागातच म्हणतो की, “ही मुले माझी नाहीत”. हे ऐकताच महिला जोरजोरात रडू लागते. आनंदाचे वातावरण क्षणातच दु:खात बदलल्याचे व्हिडिओत दिसून येते. सांगितले जात आहे की, महिला तिच्या प्रेग्नंसीआधी भारतात फिरायला आली होती, हेच कारण आहे की तिच्या पतीचा तिच्यावर विश्वास बसत नाहीये की ही मुले त्याचीच आहेत. गोऱ्या रंगाच्या या कपलला सावळी मुले कशी होऊ शकतात असा प्रश्न पती वारंवार व्हिडिओत करताना दिसून येतो. पण थांबा, यामागचे सत्य काही वेगळेच आहे.
व्हिडिओचा सखोल तपास केल्यानंतर असे समोर आले आहे की हा सर्व ड्रामा आणि हा व्हिडिओ खोटा आहे. यात दाखवण्यात आलेली प्रत्येक गोष्ट ही एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. म्हणजेच व्हिडिओत करण्यात आलेला दावाही खोटा आहे आणि हा व्हिडिओ देखील फेक आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी वास्तववादी दिसत आहेत की जवळजवळ प्रत्येक यूजरला ही दृश्ये खरीखुरी असल्याचा भास झाला आहे. दररोज, एआय क्रिएटेड व्हायरल व्हिडिओ लोकांच्या भावनांवर खेळत आहेत, म्हणून कोणत्याही क्लिपवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचा स्रोत आणि सत्यता तपासा. हा व्हायरल व्हिडिओ @memexsport नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.