
एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्... घटनेचा लाइव्ह Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इजिप्तमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ मार्सा मटरूह येथे ही घटना घडून आली. हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. हे ठिकाण त्याच्या अद्वितीय कड्यांसाठी आणि तीव्र समुद्राच्या लाटांसाठी ओळखले जाते. दूरवरून पाहिले तर हे ठिकाण आश्चर्यकारक दिसते, परंतु जवळून पाहिले तर हे सौंदर्य कधीकधी प्राणघातक ठरू शकते. घटनेच्या वेळी, एक चिनी महिला पर्यटक समुद्रकिनारी असलेल्या कड्यांकडे फोटो काढत होती. तिने नारिंगी रंगाचा ड्रेस परिधान केला होता आणि खडकावर बसून ती फोटो काढण्यासाठी पोज देत होती. पण पुढे जे घडलं त्याचा तरुणीने स्वप्नातही विचार केला नसावा. फोटो काढण्याआधीच समुद्राची लाट वेगाने महिलेच्या दिशेने धावते आणि तिला घेऊनच ती पाण्यात परतते.
Mısır’ın Akdeniz kıyısındaki Mersa Matruh kentinde bulunan Matrouh Eye adlı doğal güzellik alanını ziyaret eden kadın fotoğraf uğruna canından oluyordu. Çinli turist kayalık bir uçurumun üzerinde oturduğu sırada gelen dev dalganın çarpmasıyla dengesini kaybederek denize… pic.twitter.com/wydXSh8hBA — Haberler.com (@Haberler) December 22, 2025
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की पाण्याच्या प्रवाहात महिला वाहून गेली. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला जवळच असलेल्या एका सेफ्टी दोरीला पकडण्यात यश मिळवले. या दोरीच्या मदतीने ती स्वतःला स्थिर करू शकली आणि हळूहळू किनाऱ्यावर पोहोचू शकली. सोशल मीडियावरील लोकांचा दावा आहे की ही सेफ्टी दोरी अलीकडेच बसवण्यात आली होती. जर ती नसती तर त्याचे परिणाम खूपच गंभीर झाले असते. अनेक जण याला तिचे दुसरे आयुष्य मानत आहेत. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @Haberler नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.