
Father Daughter Viral Video
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात ही हृदद्रावक घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावरचे मायचे छप्पर हरवले आहे. वडीला चिमुकलीला शाळेत सोडायला गेले होते. यावेळी त्यांचा गेटवरच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारिक मेवाती असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ते आपल्या मुलीला सोडायला आले होते. त्यांनी मुलीला गेटच्या आत सोडल्यावर परतातान ते अचानक खाली बसाला. यांनतर त्यांच्या घराच्यांना याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारिक यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
व्हायरल व्हिडिओ
यूपी –
बुलंदशहर जिले के कस्बा स्याना में बेटी को छोड़ने आए तारिक मेवाती की स्कूल गेट पर अचानक मौत हो गई !!@Shahnawazreport pic.twitter.com/vOC8BJgswb — Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 20, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SachinGuptaUP या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्या तीन वर्षाच्या चिमुकलीला तर तिच्या वडीलांसोबत काय घडले हे माहितही नसेल, तिच्या वडीलांना आपल्या लेकीची ती भेट शेवटची ठरले हे माहितीही नसेल अशी हळहळ व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे भरुन आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.