(फोटो सौजन्य – Instagram)
अनेकदा आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल की खऱ्या प्रेमाला कधीही घरच्यांकडून मान्यता मिळत नाही. जात, धर्म, समाज या सर्वांचा विचार करत अनेकदा कुटुंबाकडून प्रेमविवाहाला मान्याता मिळत नाही. पण अलिकडेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक सुंदर दृश्य दिसले ज्यात मुलगी आपल्या बाॅयफ्रेंडविषयी वडिलांना सांगताना दिसली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ऐकूण वडिल अजिबात नाराज होत नाही तर आयुष्याचे चार बोल तिला ऐकवत ते आनंदाने तिच्या या नात्याचा स्वीकार करतात. अनेकांना वडिलांचे विचार आणि त्यांचा समजूतदारपणा भाळतो आणि लोक वेगाने व्हिडिओला शेअर करु लागतात. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, मुलगी तिच्या वडिलांचा हात धरून दिसते, यावेळी ती खूप घाबरलेली दिसते. मग, थोडे धाडस करून ती तिच्या वडिलांना म्हणते, ” बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. माझा ११ वर्षांपासून एक बॉयफ्रेंड आहे.” यावर मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी ठरते. अशा प्रकरणांमध्ये पालकांनी रागावणे अपेक्षित असले तरी, मुलीच्या वडिलांनी जे सांगितले त्याने इंटरनेटवर सर्वांचे मन जिंकले. ते मोठ्या प्रेमाने म्हणाले, “हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते. काळजी करण्याचे काय कारण आहे?”. वडिलांकडून हे ऐकून मुलीला अश्रू अनावर झाले आणि हे अश्रू भीतीचे नव्हते तर आनंदाचे होते. वडिलांनी तिला ही चांगली बातमी सांगितली आणि सांगितले की दोन्ही मुले आता स्वावलंबी झाली आहेत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की धर्म, जात किंवा पैसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगा एक चांगला माणूस असावा आणि त्यांच्या सुंदर मुलीला आनंदी ठेवावे. ते म्हणाला, “मला माझ्या मुलीच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे.” वडिलांच्या या शब्दाने फक्त मुलीलाचं नाही तर सोशल मिडियावरील सर्वच यूजर्सना आनंद दिला. कुटुंबाचा सपार्ट मनाला सुखावून जातो. वडिलांच्या कृतीने फक्त मुलीचेच नाही तर यूजर्सचेही मन जिंकले. त्यांच्या विचारसरणीचे अनेकांनी काैतुक केले आणि प्रत्येक पालकाने असा विचार करावा अशी इच्छा काहींनी व्यक्त केली. घटनेचा हा व्हिडिओ मुलीच्या अधिकृत @driiiishtiiii या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






