
Stunt viral video
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका कार रस्त्यावरुन वेगाने चालली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु आहे. या कारच्या छतावर काही तरुण बसलेले आहे. हे तरुण अचानक गाडीवर उभे राहून डान्स करायला जातात. पण याच वेळी दुसऱ्या बाजूने एक टेम्पो येते असतो. टेम्पो अचानक गाडीच्या समोर आल्याने कार चालक ब्रेक मारतो. यामुळे कारच्या छतावर असलेले तरुण हवेत उडतात आणि थेट टेम्पोच्या चाकाखाली येतात. सुदैवाने टेम्पो चालक देखील तातडीने ब्रेक मारतो. यामुळे त्यांचा जीव वाचतो. जर टेम्पो चालकाने वेळेत ब्रेक मारला नसता तर तरुणांच्या अंगावर गाडी गेली असते. सध्या या भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हद्दच पार! ट्रेनच्या सीटवर महिलेने चक्क बनवली मॅगी; Video Viral होताच रेल्वे प्रशासनाकडून…
व्हायरल व्हिडिओ
ट्रक ड्राइवर ने तुरंत प्रभाव से ब्रेक लगा दिया, वर्ना सारी गलती ट्रक ड्राइवर की होती, पता नहीं लोग उस ड्राइवर के साथ क्या क्या करते,
हादसे बड़ा हो सकता था, एक विडियो बनाने के लिए लोग जिंदगी के साथ खिलवाड़ कर बैठते हैं। pic.twitter.com/zboaNkBsTx — Pappu Ram Mundru Sikar (@PRMundru) November 20, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @PRMundru या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, स्वत: तर जाणार, पण दुसऱ्यालाही सोबत घेऊन जाणार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने लोक केवळ एका रिलसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत..? असा प्रश्न केला आहे. तर काही लोकांनी अशा लोकांमुळेच अपघात जास्त घडतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.