गटराच्या पाण्यात बुडवून खाल्ली सोनपापडी
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ सोसल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच जुगाड, भांडण, डानस रिल्स स्टंट असे व्हायरल होताना दिसतात. तसेच तुम्ही खाद्यप्रेमींचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. हे खाद्यप्रेमी फुड ब्लॉगचे अनेक व्हिडिओ पोस्ट करतात.
कोणत्या ठिकाणी काय खायला चांगले मिळते याचे व्हिडिओ बनवून ते शेअर करत असतात. मात्र अनेकदा असे किळसवाण व्हिडिओ पाहायला मिळतात की, काय बोलावे ते कळत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील किळसवाणे वाटेल. कारण एका व्यक्तीने सोनपापडी गटारीच्या पाण्यात बुडवून खाल्ली आहे. हा व्हिडिओ सोशल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती गटारीजवळ फाटके कपडे घालून उभा आहे. त्याच्या हातात सोनपापडीचा डबा आहे. काही वेळाने ते सोनपापडीचा बॉक्स ओपन करतो. त्यानंतर तो सोनपापडीचा डब्बा गटारीच्या पाण्याने भरतो. त्यामध्ये सगळी सोनपापडी गटारीच्या पाण्यात भिजते. नंतर तो ती गटारीच्या पाण्याने भरलेली सोनपापडी खायला सुरूवात करतो.तो इतक्या विचित्र पद्धतीने खात आहे की, पाहून किळसवाणे वाटत आहे. एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर punitsupper_star या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत असलेल्या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, एखाद्या गरीबाला दिला असता सोनपापडीचा डबा तर त्यांची दिवाळी साजरी झाली असती, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काय अरे अन्नाची नास धुस करतात, लाईक मिळवण्यासाठी असले स्टंट काय कामाचे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, अरे अजून कर असेच. या व्हिडिओवरून लक्षात येते की, फेमस होण्यासाठी लोक काहीही करू शकतात. अन्न देखील वाया घालवतात.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.