जीवाशी खेळ! पाय ठेवायला जागा नाही तरीही तरूणाचा ट्रेनला लटकत प्रवास; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसून पोट दुखून येते. कधी स्टंट, तर कधी जुगाड, कधी डान्स रिल्स तर कधी भांडणाचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. याशिवाय तुम्ही अनेक लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील.
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, लोक ट्रेनमध्ये गर्दी असेल तरीही ट्रेलला लटकत प्रवास करतात.यामुळे अनेक अपघातही घडलेले आहेत तरीही लोकांना याची भिती वाटत नाही. आपल्याला जीव धोक्यात घालताना कोणताही विचार ते करत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरूण ट्रेमनमध्ये जागा नसूनही ट्रेनच्या दरवाज्याला लटकत प्रवास करत आहे. त्याला मरणाची भिती नसल्यासारखे वाटत आहे.
ट्रेनला लटकत प्रवास
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक रेल्वे स्टेशन दिसत असून प्लॅटफॉर्म एक ट्रेन उभी आहे. या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. तरीही अनेक लोक ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. एक तरूणही असाच प्रयत्न करत आहे. तो प्रवाशांनी भरलेल्या दरवाज्यात ट्रेनला पकडून उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला साधे पकडण्यासाठी देखील तिथे जागा नाही तरीही तो ट्रेनला लटकत उभा आहे. त्याचा पाय हवेत तरंगत आहे. अचानक ट्रेनचा वेग वाढतो. तरीही तो उतरत नाही. यामुळे त्याचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे. मात्र हे त्याच्या लक्षात येत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Have a safe journey!
Hanging on train doors is dangerous and not worth the risk. Please prioritize your safety and wait for the next train. #BeResponsible #BeSafe pic.twitter.com/3jboEPqYVN
— RPF INDIA (@RPF_INDIA) May 27, 2023
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RPF_INDIA या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, खाली पडला तर खेळ संपला. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे अधिक धोकादायक आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, अरे भाऊ, पडशील जीव वाचवण्यासाठी देखील वेळ मिळणार नाही. एका युजरने असे धोकादायक स्टंट न करण्याचा सल्ला लोकांनी दिला आहे. अशा अनेक प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. मात्र अद्याप हा व्हिडिओ कोणत्या स्टेशनचा आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.