कपडे धुण्यासाठी अप्रतिम जुगाड
सोशल मीडियावर कधी पाय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे मजोशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, हसूनहसून पोट दूखून येते. तुम्ही जुगाडाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी कधी असे अप्रतिम जुगाड पाहायला मिळतात की, खरेच कौतुक करावे वाटते कर कधी असे जुगाड असतात की, हसू आवरता येत नाही.
या जुगाड करणाऱ्यांचे म्हणणे असते यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि पैसाही. सध्या असाच एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने कपडे धुण्यासाठी असा जुगाड केला आहे की त्याचा जुगाड पाहून लोकही हात जोडतील. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. पण या व्यक्तीचा जुगाड पाहून कंपनीवाले देखील त्याच्यासमोर हात जोडतील.
बाईक वॉशिंग मशीन
व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस शेतात कपडे घेऊन गेला आहे. तिथे तो शेताच्या पाठात पहिल्यांदा काही कपडे टाकतो. मग तो त्या पाण्यात वॉशिंग पावडर टाकतो. त्यांनतर दुसऱ्या बाजूल एक लाल रंगाची बास्केट पाहाला मिळेल ज्यामध्ये हे कपडे जातात. त्या व्यक्तीने ती बास्केट एका गोल चाकाला जोडली असून चाक गाडीच्या चाकाला जोडलेले दिसत आहे. नंतर तो त्या बास्केटमध्ये कपडे गेल्यानंतर त्यामध्ये तो आणखी पावडर टाकून ती बंद करतो मग बास्केट बंद करून गाडी सुरू करतो. गाडी सुरू होताचा ती बास्केट अगदी जोरात गोल फिरू लागते.
हे देखील वाचा- Viral Video: रावण दहनाआधीच लंकापतीचा पुतळा धापकन आदळला अन्…; पाहा व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sigma_sad9 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा जुगाड भारताबेहर गेला नाही पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, गरीबांची वॉशिंग मशीन, आणखी एका युजरने म्हटले आहे की, हार्ड वर्क नाही स्मार्ट वर्क, तर पर्यावरण अनुकूल वॉशिंग मशीन असेही एकाने म्हटले आहे. अनेकांनी व्हिडिओवर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत.