viral video bangluru man told auto driver to talks in hindi, video goes viral sparks outrage in kanndians
एकीकडे महाराष्ट्रात हिंदी मराठी वाद सुरु आहे. तर दुसरीकडे कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये देखील भाषेवरुन वाद सतत सुरुच असतो. बंगळुरूमध्ये पुन्हा एकदा भाषेच्या मुद्यावरुन वादाची ठिणगी पेटली आहे. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका प्रवाशाने ऑटो ड्रायव्हरला हिंदी बोलण्याचा आग्रह केला होता यावरुन हा वादा सुरु झाला आहे.
झालं असे की, एक उत्तर भारतीय तरुणाने एका ऑटो ड्रायव्हरला हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह केला. तरुण ऑटोड्रायव्हरला म्हणत असतो की, “बंगळुरूमध्ये राहायचं असेल, तर हिंदीत बोल.” तर तरुणासोबतचे मित्र त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, ड्रायव्हर यावर प्रत्युत्तर देत, “तू बंगळुरूमध्ये आला आहेस, कन्नडमध्ये बोल. मी हिंदी बोलणार नाही” असे म्हणतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑटो ड्रायव्हर आणि तरुणांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद सुरु आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु या व्हिडिओमुळे कन्नड भाषिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
ಹಿಂದಿ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆ ಅಲ್ಲ. pic.twitter.com/sKBlGmbdX0
— ವಿನಯ್. ಎಸ್. ರೆಡ್ಡಿ (@Vinayreddy71) April 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Vinayreddy71 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 8 लाखाहूंन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झाला आहे. एका युजरने म्हटले आहे की, “बंगळुरूमधील अनेक लोक हिंदी समजतात, पण तरीही तुम्ही कन्नड शिकण्याचा प्रयत्न करत नाही, आमच्याशी वाद घालता हे चुकीचे आहे.” दुसऱ्या एका युजरेने आपण जिथे राहतो, तिथल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे असे म्हटले आहे.” तिसऱ्या एकाने हिंदीसोबत अंहकार जबरदस्तीने येतोच असे म्हटले आहे.
या संपूर्ण घटनेने ‘स्थानिक भाषा vs राष्ट्रभाषा’ हा वादवर पुन्हा एकदा ठिणगी पेटली आहे. भारत देश हा आपल्या भाषिक विविधतेसाठी ओळखला जातो. प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेचा आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कोणतीही भाषा दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न किंवा त्याचा अभाव, सामाजिक सलोखा बिघडवू शकतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.