रावणाचा पुतळा उभारताना धापकन खाली पडला
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा एखादा सण आला की, त्याबद्दल अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरूवात होते. काल दसरा यानिमित्ताने अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळत आहेत. रावण दहनाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. रावण दहनाचे एक व्हिडिओ तर असा आहे की, रावणाला जाळायला गेले मात्र रावणानेच पुन्हा लोकांवर आगीचे गोळे फेकल्याचे दिसत आहे.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मात्र हा व्हिडिओ रावण दहनाच्या आधीचा पुतळा उभा करतानाचा व्हिडिओ आहे. पुतळा इतक्या जोरात खाली पडला आहे की, तेथील सर्व लोक घाबरून पळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
पुतळा धापकन आदळला
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक रावण दहनासाठी पुतळा उभा करायची तयारी करत आहेत. अनेकजण रावण्याच्या पुतळ्याला बांधलेली दोरी खेचून त्याला उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची दोरी एका ट्रॅक्टरला बांधलेली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. अगदी लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत लोक मैदानावर दिसत आहेत. एक क्षणी पुतळा उभा होतो मात्र इतक्या जोरात हवा येते की, पुतळा धपकन खाली आदळतो. तेथील सर्व लोक इकडे तिकडे पळू लागतात.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर apna_pareo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत अनेक लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर अपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, रावणाला लागले तर नाही ना, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, लोकांसाठी तर मजेशीर आहे, पण बनवणाऱ्याचे कष्ट वाया गेले, तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.