viral Video Couple's romance on a speeding bike Video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायाल मिळेल लक्षात येत नाही. अनेकदा लोक असे व्हिडिओ बनवतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ बनवतात जे पाहिल्यावर राग अनावर होतो. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी अनेकदा लोक असे स्टंट करतात की, यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. विशेषत: तरुण मुला-मुलींचा यामध्ये समावेश असतो. अलीकडे तर धावत्या बाईकवर रोमान्स करण्याचा ट्रेंडच कपल्समध्ये सुरुच आहे.
अनेक शहरांमध्ये प्रेमी युगल रस्त्यावर धावत्या बाईकवर अश्लील चाळे करत असल्याचे व्हिडीओ बनवतात.सध्या असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपुरमध्ये घडली असून यामध्ये एक कपल भर रस्त्यात धावत्या बाईकवर रोमान्स करत आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना पोलिसांच्या क्षेत्रात घडली आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला दुचाकीवर समोर बसवून अश्लील कृत्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो विनाहेल्मेट दुचाकी चालवून नियम तोडतच आहे मात्र, असे भर रस्त्यात गाडीवर रोमान्स करणे देखील त्यांना महागात पडू शकते. यामुळे त्यांच्या अपघात देखील होऊ शकतो. हा व्हिडिओ या प्रेमी युगलांनी बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच पोलिसांना याची माबिती मिळताच त्यांनी दोघांना देखील पकडे असनू त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. अशा व्हिडिओमधून तरुणाई स्वत:च्या जीवासोबत दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Reel जो न कराए…. कानपुर में चलती बाइक पर रोमांस हो रहा है. बाइक की टंकी पर बैठी लड़की गले में बाहें डालकर झूम रही है. pic.twitter.com/bOMWfzi20w
— बलिया वाले 2.0 (@balliawalebaba) January 11, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत अनेकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, या टिकटॉकने तरुणांना वेडं बनवले आहे, कधीही कुठेही रिल बनवायला सुरुवात करतात, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, घरात जाऊनरोमान्स करावा, असे रस्त्यावर करणे योग्य नाही. तर आणखी एकाने यामुळे अलीकडच्या पीढीमध्ये चुकीचा संदेश पसरतो असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.