Viral Video: मुंबई लोकमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; एकमेकींच्या झिंझ्या उपटत धु धु धुतले(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड यांशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अलीकडे मारामारीचे, खूनांचे, अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोक विरारच्या ट्रेनमधील आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे चर्चेत असणारी ही ट्रेन अलूकडे कोणत्या कोणत्या कारणांवरुन चर्चेचा विषय बनत असते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत महिला एकमेंकीना बेदम मारत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी हे असे रोज पाहायला मिळत असे म्हटले आहे. चला तर नेमकं काय घडले ते जाणून घेऊयात.
नेमकं घडलं तरी काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहमीप्रमाणे मुंबई लोकच्या महिल्यांच्या डब्यामध्ये गर्दी दिसत आहे. याचदरम्यान दोन महिलांच्या कोणत्यातरी कारणांवरुन वाद सुरु होतो. काही वेळाने या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. या महिला एकमेंकीच्या झिंझ्या उपटत मारत असतात. महिलांचा हा वाद बऱ्याच वेळ रंगतो. काही वेळाने इकर काही महिला त्यांचा वाद सोडवण्यासाठी येतात. या डब्यातीलच एका महिलेने हे दृश्य कॅमेरात कैद केले असावे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून लोकल प्रवासात त्याच जोशाने सामोरे जाणं साधी गोष्ट नाही. यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते.ही तपश्चर्या केली तर कुरुक्षेत्रावर विजय नक्कीच मिळणार.” एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अरे लोकांना झालंय काय कधीही कुठेही सुरु होतात, तर दुसऱ्या एकाने मजा आली बघायला असे म्हटले आहे. काही लोकांनी हे दृश्य दिवसांतून एक वेळा तरी पाहायला मिळते असे म्हटले आहे. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.