Viral Video crazy Jugad to bring down the luggage from the third floor video goes viral
अलकीडे सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळातात. भांडण, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जुगाडाचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहयाल मिळतात. जुगाडा करणाऱ्यांच्या मते, यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि पैसाही वाचतो. तसेच कधी असे जुगाडा पाहायला मिळातात की, पाहून हसू आवरणे कठी होऊन जाते. तर कधी असे जुगाड पाहायला मिळातात की जुगाड करणाऱ्याचे कौतुक केल्याशिवाय आपण राहात नाही.
सध्या असाच एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकदा आपले काम वाचवण्यासाठी आपण एखदा शॉर्टकट निवडतो. असे काहीचे या कामगांरांना केले आहे. घराची शिप्टींग करताना अनेकदा सामाना ने-आण करण्यात खूप वेळ जातो. यामुळे खूप डोकेदुखी होते. जीव अक्षरश: तळमळून जातो. अगदी घामाघूम होऊन जातो. त्यात तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरुन सामान खाली आणायचे असे तर मग काही खरे नतरे. अशा वेळी काहीतरी भन्नाट असा जुगाडच आपल्या कामी येतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतच तुम्ही पाहू शकता की, तिसऱ्या मजल्यावरुन सामान खाली आणण्यासाठी कुटुंबीयांनी भन्नाट असा जुगाड केला आहे. तुम्हा पाहू शकता की, एक कुटुंब तिसऱ्या मजल्यावरुन घरातील सामान खाली आणत आहे. यासाठी त्यांनी घराच्या बाल्कनीतून खाली उभ्या असलेल्या टेम्पोला एक लांब आणि मजबूत चादल लटकवली आहे. या चादीरीवरुन फर्निचर, सुटकेस, गाद्या आणि मोठे मोठे बॉक्स पाठवत आहे. हे सर्व सामान खाली असलेल्या टेम्पोमध्ये चादीरीवरुन पडत आहे. सर्व सामान अगदी वॉटर स्लाईडवरुन माणूस पाण्यात जातो तसे बरोबर टेम्पोमध्ये जात आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामावर @gkquestions5079 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, याला म्हणतात जुगाडू डोकं, तर दुसऱ्या एकाने तिथूनच तुम्ही पण खाली या असे म्हटले आहे. आणखी एकाने काचेचे सामान असे फेकले तर खाली पडून फुटू शकते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.