Viral Video: चार तरुण बारमधून बाहेर पडले अन्...; नशेत त्यांनी 'असं' काही केले की पाहून पोट धरुन हसाल
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी चित्र-विचित्र व्हिडिओ तर कधी मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तुम्ही अनेक मद्यपान करणाऱ्यांचे देखील व्हिडिओ पाहिले असतील. कोणी दारुच्या नशएत बैलाच्या समोर जाऊन काहितरी हिरोगिरी करताना, तर कोणी शायरी म्हणातानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील.
सध्या असाच एक पण अतिशय मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. तुम्हाला अनेकदा शासनाने आणि पोलिसांनी ‘Don’t Drink And Drive’ असे सांगितले असेल. याच्या अनेक सुचना देखील दिल्या असतील. आपल्या स्वत:च्या जीवासाठी आणि कुटूंबीयांसाठी हा नियम पाळणे अत्यंत म्हत्त्वाचे आहे. मात्र, तरीही काही लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. अशा अनेक घटना अलीकडील काही काळात समोर आल्या आहेत.
मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही उलटाच आहे. या चार तरुणांनी ‘Don’t Drink And Drive’ या नियमाला जरा जास्त मनावर घेतलेले दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक बार दिसत आहेत. दरम्यान त्या बारमधून चार लोक बाहेर पडतात. त्यानंतरते पार्किंगमध्ये पार केलेल्या त्यांच्या गाडीकडे जातात. पण त्यानंतर ते असे काही करतात की, व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठिण होईल. तुम्ही पाहू शकता की, हे चारही तरुण गाडी उचलून नेण्याचा प्रयत्न करत असतात. या व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर हशा पिकला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
They took ‘𝗗𝗼𝗻’𝘁 𝗱𝗿𝗶𝗻𝗸 & 𝗗𝗿𝗶𝘃𝗲’ so seriously 😂 pic.twitter.com/UXvzN1MVEV
— Mehwish (@MyWishIsUs) January 7, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @MyWishIsUs एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, दारु ह्यांनी चढली आहे की, हे दारुला तर दुसऱ्या एका युजरने, वा, भाई! तर ह्यांनी डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह खूप गांभीर्याने घेतलं असे म्हटले आहे. काहींनी यांना पुरस्कार दिला पाहिजे असेही म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, या व्हिडिओने संपूर्ण सोशल मीडियावरहशा पिकला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.